Mahabreaking

[breaking_news]

cooperative sector :सहकाराचा गड कायम राहणार की परिवर्तनाचा झेंडा फडकणार? उद्या फैसला

cooperative sector : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. एकूण १ हजार ८५७ मतदारांपैकी १ हजार ७५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ९४.०३ टक्के मतदान झाले असून, सोमवारी बुलढाणा येथे होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

sector

बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९४.०३ टक्के मतदान;   १३ जागा बिनविरोध, उर्वरित ८ जागांसाठी रंगला सामना; शिंगणे-जाधव विरुद्ध कायंदे-काझी लढतीचा निकाल उद्या

अशोक इंगळे

सिंदखेडराजा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. एकूण १ हजार ८५७ मतदारांपैकी १ हजार ७५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ९४.०३ टक्के मतदान झाले असून, सोमवारी बुलढाणा येथे होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

sector

बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला वगळता इतर पक्षांनी बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना सहमती दर्शविली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनी पाच जागांची मागणी केली होती. मात्र सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका घेत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दोन जागा देण्याची तयारी दर्शविली होती. जागावाटपावर एकमत न झाल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

या निवडणुकीत सहकार पॅनेलचे १३ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित आठ जागांसाठी मतदान झाले. सहकार पॅनेलच्या प्रचाराची धुरा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांभाळली. दोन्ही नेत्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेत पॅनेलच्या उमेदवारांसाठी मतदारांशी संपर्क साधला.

दुसरीकडे परिवर्तन पॅनेलची धुरा आमदार मनोज कायंदे आणि जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी सांभाळली. दोन्ही पॅनेलने आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी मतदारांशी संपर्क साधत प्रचाराची रणनीती आखली. सहकार क्षेत्रात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा प्रभाव असून या निवडणुकीत तो कितपत कायम राहतो आणि परिवर्तन पॅनेल किती प्रभावी कामगिरी करते, याचे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

मतदारसंघनिहाय उत्स्फूर्त मतदान

इतर सहकारी संस्था मतदारसंघात १०० टक्के मतदान झाले. ग्रामसेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात ९८.०६ टक्के, कृषी उत्पन्न प्रक्रिया मतदारसंघात ९६ टक्के, तर नागरी पतसंस्था मतदारसंघात ९२.०२ टक्के मतदान झाले.

मतदान केंद्रनिहाय बुलढाणा येथे २३८, चिखली १९९, मलकापूर १०८, मोताळा १६४, नांदुरा ११३, शेगाव ११३, खामगाव ९७, जळगाव जामोद ११५, संग्रामपूर १२५, मेहकर १३८, लोणार १०४, सिंदखेडराजा १२८ आणि देऊळगाव राजा येथे १०९ मतदारांनी मतदान केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top