Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Vansh :भावना पब्लिक स्कूलच्या वंशची ‘अँबॅकस मॅथ जीनियस’ स्पर्धेत जिल्हास्तरावर झेप!

Vansh : एसआयपी अँबॅकसतर्फे आयोजित अकोला मॅथ जीनियस स्पर्धा – सिझन १ चा भव्य पारितोषिक वितरण समारंभ अकोला येथील चांडक मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. या स्पर्धेत भावना पब्लिक स्कूल, पातूर येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी वंश संजय गोतरकर याने जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

vansh

पातूर : एसआयपी अँबॅकसतर्फे आयोजित अकोला मॅथ जीनियस स्पर्धा – सिझन १ चा भव्य पारितोषिक वितरण समारंभ अकोला येथील चांडक मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. या स्पर्धेत भावना पब्लिक स्कूल, पातूर येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी वंश संजय गोतरकर याने जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ही स्पर्धा १४ डिसेंबर रोजी अकोल्यातील आर.एल.टी. कॉलेज येथे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. लहान वयातच गणिताची गोडी निर्माण व्हावी, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असल्याचे एसआयपी अँबॅकसचे मुकेश सहानी यांनी सांगितले.

प्रत्येक वर्गासाठी पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे ३०००, २००० व १००० रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय प्रत्येक वर्गातील १० विद्यार्थ्यांना उत्तेजनपर बक्षिसे देण्यात आली.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वंश गोतरकर यास “परफॉर्मर अवॉर्ड” देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातून इयत्ता चौथीमधून अकोला जिल्ह्यात अव्वल ठरण्याचा मान वंशने पटकावला आहे.

मुकेश सहानी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व पालकांच्या उपस्थितीत वंशला ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यानंतर भावना पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सरोज सुरवाडे, शिक्षिका पूजा उपरवट व इतर शिक्षकवृंदांनी शाळेत त्याचा विशेष गौरव करत शुभेच्छा दिल्या.

वंशने आपल्या यशाचे श्रेय संस्थापक अमोल सोनोने, कार्यकारी संचालिका सरिता तायडे, सुवर्णा डाखोरे, सर्व शिक्षक-शिक्षिका वृंद, सौ. शीतल भोसले मॅडम, तसेच आई-वडील व आजी-आजोबा यांना दिले आहे.
तो डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर येथील माजी अधीक्षक सुखदेवराव गोतरकर यांचा नातू असून, त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top