Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

The foot procession :श्री संत गजानन महाराजांचा पायदळ पालखी सोहळा मार्गस्थ

The foot procession : स्थानिक पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर सेवा समिती, लक्ष्मी नगर बोरगाव मंजू यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही परंपरेनुसार संत गजानन महाराजांचा पायदळ पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाला. दि. ११ ते १५ जानेवारी दरम्यान पाच दिवस चालणारा हा पालखी सोहळा रविवारी शहरातील मुख्य मार्गावरून नगरपरिक्रमा करीत शेगावकडे प्रस्थान झाला.

Shri Sant Gajanan Maharaj

हजारो भाविकांचा सहभाग; “जय गजानन”च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

संजय तायडे

बोरगाव मंजू : स्थानिक पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर सेवा समिती, लक्ष्मी नगर बोरगाव मंजू यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही परंपरेनुसार संत गजानन महाराजांचा पायदळ पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाला. दि. ११ ते १५ जानेवारी दरम्यान पाच दिवस चालणारा हा पालखी सोहळा रविवारी शहरातील मुख्य मार्गावरून नगरपरिक्रमा करीत शेगावकडे प्रस्थान झाला.

सकाळी लक्ष्मी नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या चरणी महापूजा व जलाभिषेक करून पालखी सोहळ्याची विधिवत सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून पालखी प्रस्थान करताच सर्वत्र “जय गजानन श्री गजानन महाराज” चा जयघोष घुमू लागला.

पालखी मार्गावर भाविकांनी स्वच्छता ठेवत, रांगोळ्या काढून व फुलांची उधळण करत श्रद्धेने स्वागत केले. अनेक भाविकांनी पालखीतील श्रींच्या चरणी मनोभावे पूजा-अर्चा करून सेवा अर्पण केली. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

या पालखी सोहळ्यात पांढऱ्या शुभ्र वस्त्रात, डोक्यावर टोपी घातलेले सेवाधारी, तसेच महिला सेवाधारी टाळ-मृदंगाच्या गजरात “गण गणात बोते”चा निनाद करीत सहभागी झाले. या पायदळ पालखी सोहळ्यात सुमारे ४०० ते ५०० भाविकांचा सहभाग असून, लहान-थोर, आबालवृद्ध, भजनी मंडळांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग नोंदविला आहे.

पायदळ पालखी सोहळ्याची दैनंदिन रूपरेषा :

दि. १३ जानेवारी : गायगाव ते नागझरी – नागझरी येथे मुक्काम

दि. १४ जानेवारी : गोमाजी महाराज नागझरी येथून शेगावकडे प्रस्थान

दि. १५ जानेवारी : शेगाव येथे कीर्तन, महाप्रसादानंतर बोरगाव मंजूकडे प्रस्थान

हा पायदळ पालखी सोहळा संत गजानन महाराज मंदिर सेवा समिती, लक्ष्मी नगर बोरगाव मंजू यांच्या वतीने यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला असून, भाविकांतून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top