Vanchit stages protes : गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी चूल पेटवून भाकर-चटणी बनवत ‘नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?’ अशा घोषणांद्वारे शासनाचे लक्ष वेधले.

वाशिम :गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी चूल पेटवून भाकर-चटणी बनवत ‘नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?’ अशा घोषणांद्वारे शासनाचे लक्ष वेधले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून, सर्वसामान्य नागरिक, गृहिणी व लघुउद्योगांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. स्वयंपाकघरातील शेगड्या थंड पडल्याने अनेकांना लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. चहाच्या टपऱ्या, फूड स्टॉल्स व इतर व्यवसायही अडचणीत आले आहेत.आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीने गॅस टंचाई तात्काळ दूर करणे, काळाबाजार रोखणे, गॅस वितरण प्रक्रिया सुलभ करणे आणि विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करण्यासह विविध मागण्या मांडल्या. या आंदोलनात रंगनाथ धांडे (जिल्हा महासचिव), ज्योतीताई इंगळे (महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), सूर्यकांत गायकवाड, दिलीप भगत, सोनाजी इंगळे, सुरेश सोनवणे, सुनिता खाडे, प्रतिभा अंभोरे, मिलन बनसोड, स्वप्नील खडसे, संतोष सरकटे, विशाल इंगोले, किशोर पंडित, अनिल खडसे, अखिल भगत, कैलास राऊत, नीलेश भोजने, अरविंद पडघान, कांताबाई खिल्लारे, कांताबाई साबळे, कल्पना देवळे, गोदावरी प्रधान, अनंत जुमडे, विलास खिल्लारे, सुमनबाई ताजने, नारायण खोडके, रवींद्र इंगोले, भगवत चव्हाण, दिनेश खडसे, महेश तायडे, दीपक आगलावे, आकाश इंगोले, प्रा. मुकुंद खडसे, महेश खडसे उपस्थित होते.

