Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Vacant posts :पातूर तालुक्यात पशुवैद्यकीय यंत्रणेतील पदे रिक्त; पशुपालक त्रस्त

Vacant posts : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत पातूर येथे तालुका लघु पशु सर्वचिकित्सालय कार्यरत असून नव्या इमारतीतून सेवा दिली जात आहे. या केंद्रांतर्गत १९ गावांचा समावेश असला तरी परिचराचे पद रिक्त असल्याने सेवा व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. तालुक्यात सुमारे २२ हजार ५०० लघु पशुधन असल्यामुळे पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद कायम ठेवण्याची मागणी होत आहे.

Vacant posts

सावरगाव येथे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी नाही, तर तीन दवाखान्यांच्या इमारती जीर्ण

पातूर : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत पातूर येथे तालुका लघु पशु सर्वचिकित्सालय कार्यरत असून नव्या इमारतीतून सेवा दिली जात आहे. या केंद्रांतर्गत १९ गावांचा समावेश असला तरी परिचराचे पद रिक्त असल्याने सेवा व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. तालुक्यात सुमारे २२ हजार ५०० लघु पशुधन असल्यामुळे पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद कायम ठेवण्याची मागणी होत आहे.

मागील अनेक वर्षे सहाय्यक आयुक्त पद प्रभारावर चालत होते; मात्र आता कायमस्वरूपी नियुक्ती झाल्याने पशुपालकांना नियमित उपचार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. १९व्या पशुगणनेनुसार तालुक्यात शेळी, देशी कोंबड्या, गाय, बैल व म्हैस वर्गीय पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

पंचायत समिती पातूर अंतर्गत उमरा, गावंडगाव, आलेगाव, पिंपळखुटा, सस्ती, सावरगाव व तांदळी बुद्रुक येथील सात पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. मात्र सस्ती, उमरा व पिंपळखुटा येथील दवाखान्यांच्या इमारती जीर्ण अवस्थेत असून नव्या बांधकामास मंजुरी मिळूनही निधीअभावी काम रखडले आहे. तसेच सावरगाव येथे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पद अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने पशुपालकांना आजारपणाच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रिक्त पदे तातडीने भरणे व पातूर येथील सर्वचिकित्सालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती राहावी, अशी मागणी पशुपालकांकडून करण्यात येत आहे.

 

  सेवा क्षेत्रातील १९ गावे

देऊळगाव शिरला, मलकापूर, चिंचखेड, बोडखा, माळराजुरा, गोंधळवाडी, सावरखेड, खानापूर, आगीखेड, कोठारी बुद्रुक, कोठारी खुर्द, पारडी, खामखेड, नांदखेड, जिरायत, बागायत व पातूर परिसरातील इतर गावे या सर्वचिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रात येतात.

 

पातूर येथे परिचराचे पद रिक्त असून सावरगाव येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पद भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. पशुपालकांना वेळेवर उपचार देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

— डॉ. यू. एम. शेगोकार, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पातूर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top