Mahabreaking

[breaking_news]

Maha Aarti :पातुरात ‘श्रीं’च्या प्रकट दिनानिमित्त महाआरती; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Maha Aarti : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त पातुर–बाळापूर महामार्गावरील चिंचेच्या झाडाखाली, जय गजानन बिछायत केंद्राजवळ 8  फेब्रुवारी रोजी   सायंकाळी सहा वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.

Maha Aarti

पातुर : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त पातुर–बाळापूर महामार्गावरील चिंचेच्या झाडाखाली, जय गजानन बिछायत केंद्राजवळ  8 फेब्रुवारी रोजी  सायंकाळी सहा वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.

जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने प्रकट दिनानिमित्त कार्यक्रमाचे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. फटाक्यांची आतषबाजी, “जय गजानन श्री गजानन” व “गण गण गणात बोते” या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. सायंकाळी सहा वाजता महाआरतीनंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी सांप्रदायिक महिला भजन मंडळींनी भक्तिगीते सादर करून आपली सेवा श्रींच्या चरणी अर्पण केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top