Mahabreaking

[breaking_news]

Two groups clash :पाण्याच्या कॅनच्या धक्क्यावरून दोन गट आमनेसामने; बाभूळगाव जहागीरमध्ये तणावपूर्ण वातावरण

Two groups clash : येथील नवीन वस्तीमध्ये दुचाकीवरून पिण्याच्या पाण्याचे कॅन नेत असताना धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून दोन गटांतील युवकांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Two groups clash

शुल्लक वादाचे हाणामारीत रूपांतर; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

बाभूळगाव जहागीर : येथील नवीन वस्तीमध्ये दुचाकीवरून पिण्याच्या पाण्याचे कॅन नेत असताना धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून दोन गटांतील युवकांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांतील युवकांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद वाढत जाऊन दोन्ही गटांतील युवक एकमेकांवर धावून गेल्याने परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवीन वस्तीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत शांतता व सौहार्द कायम राखण्याचे आवाहन केले.

याबाबत एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला असता, गावात दंगल झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) सुदर्शन पाटील यांनी दोन गटांमध्ये शुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी दोन्ही गटांतील संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरू असून, किरकोळ वादामागील नेमके कारण व दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होण्यामागील बाबींचा पोलीस तपास करीत आहेत. वृत्त लिहिपर्यंत दोन्ही गटांतील संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top