Two friends die: कालपर्यंत एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत असलेले दोन जिवलग मित्र एका भीषण अपघातात काळाच्या पडद्याआड गेल्याने डोणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. शाकिब आणि साहिल या दोन मित्रांचा एकाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने लक्ष्मी नगरसह संपूर्ण डोणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी दोघांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी झाली होती.

कालपर्यंत सोबत, आज एकाच वेळी अखेरचा निरोप; शाकिब-साहिलच्या निधनाने डोणगाव सुन्न
डोणगाव : कालपर्यंत एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत असलेले दोन जिवलग मित्र एका भीषण अपघातात काळाच्या पडद्याआड गेल्याने डोणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. शाकिब आणि साहिल या दोन मित्रांचा एकाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने लक्ष्मी नगरसह संपूर्ण डोणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी दोघांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी झाली होती.
डोणगाव येथील लक्ष्मी नगर परिसरात राहणारे शेख साहिल शेख जफर आणि शेख शाकिब शेख शकील कुरेशी हे दोघे जिवलग मित्र बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी रात्री मोटारसायकलने मेहकरकडे जात होते. रात्री सुमारे ७.४५ वाजताच्या सुमारास मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर नागपूरकडे जाणाऱ्या पुलाजवळ त्यांच्या मोटारसायकलला मेहकरकडून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, दोन्ही मित्र मोटारसायकलीसह रस्त्याच्या खाली जाऊन पडले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मेहकरकडून डोणगावकडे येणारे अमोल धोटे व त्यांच्या मित्रांनी दोन्ही जखमींना बाहेर काढून मदत केली. त्यांनी तातडीने १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, उपचारासाठी नेण्यापूर्वीच दोन्ही मित्रांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. गुरुवारी, दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे अडीच वाजताच्या सुमारास दोघांची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली. जिवलग मित्रांना अखेरचा निरोप देण्यासाठी डोणगावसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. एकाच वेळी दोन तरुण मित्रांची अंत्ययात्रा निघाल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. जवळजवळ एकाच वेळी दोघांचा दफनविधी करण्यात आला. दरम्यान, वृत्त लिहिपर्यंत डोणगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची गुन्हा नोंद झालेली नव्हती.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

