Mahabreaking

[breaking_news]

Samarth Pharmacy College:  समर्थ फार्मसी महाविद्यालयाचा एम. फार्म अंतिम वर्षाचा १०० टक्के निकाल; विद्यार्थिनींची दमदार कामगिरी

Samarth Pharmacy College: श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे डी. फार्म., बी. फार्म. आणि एम. फार्म. हे अभ्यासक्रम सुरू आहेत. नुकताच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एम. फार्मसी चौथ्या सेमिस्टरचा निकाल जाहीर झाला असून, महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

Samarth Pharmacy

 एम. फार्मसीच्या निकालात समर्थ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम; मुलींनी मारली बाजी

गजानन तिडके

देऊळगाव राजा : श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे डी. फार्म., बी. फार्म. आणि एम. फार्म. हे अभ्यासक्रम सुरू आहेत. नुकताच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एम. फार्मसी चौथ्या सेमिस्टरचा निकाल जाहीर झाला असून, महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

एम. फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थिनींनी निकालात बाजी मारत महाविद्यालयाच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

‘जिद्द आशा बांध गाठी, झेप घे तू घे भरारी; टाक मागे व्यर्थ भीती, सोस तू आघात सारे’ या ओळींना साजेशी कामगिरी करत एम. फार्मसीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी यशाची गगनभरारी घेतली. एम. फार्मसी फार्माकॉग्नसी शाखेत वैष्णवी गजानन आघाव हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर पूनम भीमराव शेळके हिने द्वितीय आणि जया सुनील नागरे हिने तृतीय क्रमांक मिळविला.

एम. फार्मसी फार्माकोलॉजी शाखेत अश्विनी गोविंद किंगरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. दिया रितेश ठाकरे हिने द्वितीय, तर कोमल माधव तांगडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे, दोन्ही शाखांतील प्रथम तीन क्रमांक विद्यार्थिनींनी पटकावले आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, सचिव श्री. सतीश कायंदे तसेच सहसचिव तथा आमदार श्री. मनोज कायंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

महाविद्यालयाच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे, उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे, विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम लड्डा, विभागप्रमुख प्रा. किशोर चराटे, डॉ. दिनेश घुबे, डॉ. पवन नारखेडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top