High Drama in Kokalwadi : जुन्या वादातून एकाने चौघांना चक्क थार कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील कोकलवाडी येथे २८ एप्रिल रोजी घडली.या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी रामेश्वर दादाराव भगत विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदुरा : जुन्या वादातून एकाने चौघांना चक्क थार कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील कोकलवाडी येथे २८ एप्रिल रोजी घडली.या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी रामेश्वर दादाराव भगत विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरउन्हात काम करणे बेतले जीवावर, देऊळगाव राजात युवकाचा मृत्यू
वरखेड येथील रहिवासी इंद्रसिंह रामलालसिंह राजपूत (वय ४९) यांचा शेती व गिट्टी खदानचा व्यवसाय आहे. नांदुरा तालुक्यातील कोकवाडीचा रहिवासी आरोपी रामेश्वर भगत व त्यांच्यात जुना वाद सुरू आहे. इंद्रसिंह राजपूत हे नातेवाइकाकडे कोकलवाडी येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी आले होते. हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर नातेवाइक अनिलसिंह पंचमसिंह राजपूत, प्रतापसिंह अरुणसिंह राजपूत, आतिषसिंह परमेश्वरसिंह राजपूत, रामसिंह मोहनसिंह राजपूत यांच्याशी बोलत थांबले होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास आरोपी रामेश्वर भगतने एमएच-५६-ए-८१११ क्रमांकाच्या महिंद्रा थार गाडीने इंद्रसिंह यांच्यासह नातेवाइकांना उडविले. या धडकेने सर्वजण जोरात बाजूला फेकल्या गेले. इंद्रसिंह राजपूत हे हातपंपाच्या बाजूने पडले. यानंतर पुन्हा आरोपीने त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. परंतु मध्ये हातपंप असल्याने त्यांचा जीव वाचला. नंतर आरोपीने पलायन केले. या घटनेत इंद्रसिंग राजपूत याच्या कमरेला तसेच उजव्या हाताला व डोक्याला मुका मार लागला. तर रामसिंग राजपूत, आतिष राजपूत व प्रतापसिंह राजपूत हे गंभीर जखमी झाले. जख्मींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणी इंद्रसिंह राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी रामेश्वर भगत याच्याविरुद्ध गुन्हा दाख्ल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.

