Tips for the officers : राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या शाखा व्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक यांच्याकरिता बुलढाणा येथे ५ ऑक्टोबर रोजी पतसंस्थांचे डॉक्टर संदीप पाटील यांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. नवीन कायदे, दर्जेदार बँकिंग व दैनंदिन व्यवहार याबाबत त्यांनी आपल्या खास शैलीत टिप्स दिल्या.

राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या शाखा व्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर
बुलढाणा: राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या शाखा व्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक यांच्याकरिता बुलढाणा येथे ५ ऑक्टोबर रोजी पतसंस्थांचे डॉक्टर संदीप पाटील यांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. नवीन कायदे, दर्जेदार बँकिंग व दैनंदिन व्यवहार याबाबत त्यांनी आपल्या खास शैलीत टिप्स दिल्या.
प्रारंभी संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक संदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रशिक्षण वर्गाला सुरुवात झाली. सहकार क्षेत्रातील अनुभवाचे गाठोडे पाटील यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसमोर उघडले. दैनंदिन व्यवहार कसे करावे, व्यक्तिमत्व विकास, उत्कृष्ट संभाषण कौशल्य, भाषाशैली यासह बँकिंगबाबत विविधांगी मार्गदर्शन त्यांनी केले.
सहकार क्षेत्रात दररोज नवनवीन बदल होताना दिसतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नेहमी अपडेट राहावे लागते. राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता नियमित विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते. प्रशिक्षणाचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. याच उद्देशाने रविवारी पतसंस्थांचे डॉक्टर संदीप पाटील यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

