Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Turmeric Seed Stock Stolen : शेतमालावर चोरट्यांची नजर, हिवरा साबळे शिवारात हळदीच्या बेन्याची १० पोती लंपास

Turmeric Seed Stock Stolen : मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे शिवारात शेतात ठेवलेले हळदीचे दहा पोते बेणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी (२३ मार्च) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, शेतमालाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Turmeric Seed Stock Stolen

डोणगाव : मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे शिवारात शेतात ठेवलेले हळदीचे दहा पोते बेणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी (२३ मार्च) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, शेतमालाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरा साबळे येथील शेतकरी गजानन नारायण साबळे यांनी गट क्रमांक १५ मध्ये सेलम जातीची अर्धा एकर क्षेत्रात हळदीची लागवड केली होती. २२ मार्च रोजी त्यांनी हळदीचे पीक काढून त्याचे बेणे तयार केले. त्यानंतर १३ पोती हळदीचे बेणे एका शेतकऱ्याला देण्यासाठी शेतातच ठेवले होते.

मात्र, २३ मार्च रोजी सकाळी संबंधित शेतकरी बेणे घेण्यासाठी शेतात गेला असता, त्यापैकी १० पोती चोरीस गेल्याचे आढळून आले. घटनास्थळी केवळ तीन पोती शिल्लक दिसून आली. परिसरात पाहणी केली असता, पोत्यांपासून रत्नापूर रस्त्याकडे जाणाऱ्या चोरट्यांच्या पाऊलखुणा आढळून आल्या. यावरून अज्ञात चोरट्यांनी नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, गजानन साबळे यांच्या शेतातील हळदीचे बेणे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी मागविले होते. याच पार्श्वभूमीवर या हळदीवर चोरट्यांनी लक्ष ठेवून चोरी केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रकरणी गजानन साबळे यांनी डोणगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून, वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे शेतकऱ्यांनी शेतमालाच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top