Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Operation Prahar :ऑपरेशन ‘प्रहार’अंतर्गत धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ४.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Operation Prahar : अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोहारा शेतशिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १७ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Operation Prahar

लोहारा शेतशिवारात जुगार अड्डा उध्वस्त; १७ आरोपींवर गुन्हा दाखल

बाळापूर : अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोहारा शेतशिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १७ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अचिंत चांडक यांच्या निर्देशानुसार अकोला पोलीस दलात ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत २१ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६.१० वाजता लोहारा शेतशिवार, ता. बाळापूर येथे जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी छापा टाकताच जुगार खेळणाऱ्या आरोपींमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी वेगाने कारवाई करत १७ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ५२ ताश पत्त्यांचे संच, ९६ हजार रुपयांची नगदी, ७ मोबाईल फोन (सुमारे ७० हजार रुपये) तसेच ३ मोटारसायकली (सुमारे २ लाख ७० हजार रुपये) असा एकूण ४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निखिल अग्रवाल, सागर नांदोकर, गणेश ताथोड, अजय चंडाळणे, आशिष ठाकरे, अमीन देशमुख, अक्षय मोहोळ, आसिफ देशमुख, संतोष गिरी, धरम सारवाण, अंकुश मेटांगे, सचिन कोकाटे, सतीश झगडे, सागर खांदोडे, मंगेश हिंगणे, ज्ञानेश्वर गारमोडे व गजानन देशमुख यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली API विजय चव्हाण, हेड कॉन्स्टेबल महेंद्र मलिया, उमेश पराये, भास्कर धोत्रे, कुशाल नेमाडे, रवी खंडारे, तसेच पोलीस कर्मचारी राज चंदेल, करण मानकर, अभिषेक पाठक, श्रीकांत पातोंड, चालक GPSI ठाकरे व पीसी खरात यांच्या पथकाने पार पाडली. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध जुगार व्यवसायाला मोठा आळा बसणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top