Mahabreaking

[breaking_news]

Gauri Chincholkar :गौरी चिंचोळकर यांना पीएच.डी.; मराठी शिक्षणावर संशोधन ठरले दिशादर्शक 

Gauri Chincholkar :अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ गौरी चंद्रशेखर चिंचोळकर यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या वतीने नुकतीच पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. लवकरच विद्यापीठाच्या वतीने त्यांना ही पदवी बहाल करून सन्मानित करण्यात येणार आहे.

Gauri Chincholkar

वाडेगाव : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ गौरी चंद्रशेखर चिंचोळकर यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या वतीने नुकतीच पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. लवकरच विद्यापीठाच्या वतीने त्यांना ही पदवी बहाल करून सन्मानित करण्यात येणार आहे.

गौरी चिंचोळकर यांनी मराठी, इतिहास व अर्थशास्त्र विषयांत एम.ए. तसेच शिक्षणशास्त्रात एम.एड. पदवी संपादन केली आहे. त्या श्रीमती शांताबाई चिंचोळकर शिक्षण प्रसारक मंडळ, वाडेगावच्या संचालिका असून जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांच्या पत्नी आहेत.

त्यांच्या संशोधनाचा विषय “इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांच्या शैक्षणिक विकासाबाबत पालकांच्या जागरूकतेचा चिकित्सक अभ्यास” असा होता. हे संशोधन कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी (जि. सोलापूर) येथे पूर्ण करण्यात आले.

या संशोधनामध्ये मराठी शाळांबाबत समाजातील बदलता दृष्टिकोन, इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषेचे कमी होत चाललेले महत्त्व, तसेच विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये मराठी विषयाविषयी घटत चाललेली आस्था यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. हे संशोधन मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भविष्यात शासनाला दिशादर्शक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

गौरी चिंचोळकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरण, गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि मराठी भाषा व शाळांचे संवर्धन यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्या सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करत आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्ह्यासह पंचक्रोशीमध्ये त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबीयांना दिले असून, त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top