Mahabreaking

[breaking_news]

Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास

Two Houses Burglarized :शहरातील गंगानगरमध्ये दोन ठिकाणी चोरट्यांनी घरे फोडून लाखो रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिणे लंपास केले. ही घटना 13 एप्रिलच्या रात्री घडली. एकाच दिवशी दोन घरे फोडून चोरट्यांनी जुने शहर पोलिसांना आव्हान दिले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Two Houses Burglarized

जुने शहर पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; घराचे कुलूप तोडून केला प्रवेश

आगाखान पठाण

अकोला : शहरातील गंगानगरमध्ये दोन ठिकाणी चोरट्यांनी घरे फोडून लाखो रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिणे लंपास केले. ही घटना 13 एप्रिलच्या रात्री घडली. एकाच दिवशी दोन घरे फोडून चोरट्यांनी जुने शहर पोलिसांना आव्हान दिले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

गंगानगर भागातील अली पब्लिक स्कूल रस्त्यालगत असलेल्या डुप्लेक्समध्ये शेख निसार शेख मोला यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 13 एप्रिलच्या रात्री प्रवेश केला. तसेच कपाटातील सोन्याचे हार,  कानातले आयरिंग, चांदीचे पैजन लंपास केले. या दागिण्यांचे जवळपास बाजार मूल्य साडेचार लाख रुपयांचे असल्याचे शेख निसार यांनी सांगितले . यामध्ये तीन तोळे सोने, पन्नास तोळे चांदीची दागिणे चोरट्यांनी लंपास केले.  शेख निसार व त्यांची पत्नी या 12 एप्रिल रोजी गावी गेले असताना ही घटना13 एप्रिल रोजी रात्री घडली  14 एप्रिल रोजी ते गावा वरून परत आले असताना त्यांना त्यांच्या घरातील कुलूप तुटलेले घरातील अलमारी इतर साहित्य अस्ताव्यस्त दिसले.  त्यामुळे, चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी लगेच जुने शहर पोलीस स्टेशन येथे चोरीची तक्रार दिली.  जुने शहर  पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी भेट देऊन तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याच रात्री  अमिन शहा चक्की च्या गल्लीमध्ये  शेहजाद यांच्या घरात चोरट्यांनी कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास केले आहे. तसेच एकाची दुचाकी लंपास केली   एकच दिवशी तीन ठिकाणी चोरीच्या घटना गंगानगर मध्ये घडल्या आहेत. तीन चोरीच्या घटना घडल्याने जुने शहर पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे. वाढत्या चोरीच्या घटना पाहता जुने शहर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top