Mahabreaking

[breaking_news]

Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष

Bhim Jayanti : येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी बुध्दाचार्य डॉ. श्रीराम गवई यांनी बुद्धवंदना घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उपस्थितांनी पुजन करून वंदन केले .

Bhim Jayanti

 वेगवेगळ्या रथावर महापुरुषांच्या प्रतीमा; जयभीमचा जयघोष

साखरखेर्डा: येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी बुध्दाचार्य डॉ. श्रीराम गवई यांनी बुद्धवंदना घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उपस्थितांनी पुजन करून वंदन केले .

Bhim Jayanti

यावेळी माजी समाजकल्याण सभापती शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव मोरे , ठाणेदार गजानन करेवाड , माजी प्राचार्य संतोष दसरे , माजी सरपंच दाऊद कुरेशी , माजी सभापती राजू ठोके  , दिलीप इंगळे यांनी आपले विचार मांडले . यावेळी सरपंच पती अमित जाधव , भाजपाचे प्रदेश सदस्य रावसाहेब देशपांडे , माजी सरपंच महेंद्र पाटील  , माजी उपसभापती सुनील जगताप , संतोष मंडळकर , देवानंद खंडागळे , वैशिष्ट्य खरात, दिलीप बेंडमाळी , माजी उपसरपंच सैय्यद रफीक , रामदाससिंग राजपूत , संग्रामसिंह राजपूत यासह गावातील नागरिक उपस्थित होते . संचालन सुभाष गवई आणि दर्शन गवई यांनी केले. तर अशोक गवई यांनी समाज प्रबोधनपर कविता सादर केली. अनिता मोरे या शालेय विद्यार्थीने डॉ बाबासाहेब काय झाले आणि आपण त्यांच्यापासून काय शिकलो यावर विचार मांडले .

त्यानंतर दुपारी तीन वाजता भीमनगरातून वाजत गाजत मिरवणूक निघाली. एका रथावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले यांची मुर्ती तर दुसऱ्या रथावर तथागत गौतम बुद्ध , छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती ठेवण्यात आली होती . प्रत्येक चौकात पुष्प वृष्टी करण्यात आली . ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच पती अमित जाधव , ग्रामपंचायत सदस्य इब्राहिम शहा यांनी पुष्पवृष्टी केली . गुजरी चौकात मुस्लिम समाजाच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले . या मिरवणुकीत विशेष आकर्षण राहिले ते मुलीच्या लेझीम व टिपरी नृत्याचे . मोठ्या संख्येने समाज बांधव आणि महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या . या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश गवई , समाज भूषण माजी सैनिक अर्जून गवई , दादाराव गवई , माजी सरपंच कमलाकर गवई , संदीप खिल्लारे यासह समाजातील युवकांनी केले होते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top