Mahabreaking

[breaking_news]

Thief :शेंबा येथील रिवाइंडिंग दुकान फोडणारा चोरटा जेरबंद; मलकापूरातून आरोपीला अटक

Thief : शेंबा येथे रिवाइंडिंग व इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Thief

सीसीटीव्ही सायरनमुळे चोरी फसली; सात महिन्यांनंतर आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

मोताळा :  शेंबा येथे रिवाइंडिंग व इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर पंढरी व्यवहारे (वय ४५, रा. तांदुळवाडी, ता. नांदुरा) यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ ते २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेदरम्यान ग्राम शेंबा येथील त्यांचे ‘सिद्धेश्वर इलेक्ट्रिक अँड रिवाइंडिंग’ दुकान अज्ञात आरोपीने चोरीच्या उद्देशाने फोडण्याचा प्रयत्न केला होता.

आरोपीने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला; मात्र दुकानातील सीसीटीव्ही सायरन सुरू झाल्याने चोरी न करता घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याची उकल करून आरोपी निष्पन्न करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने समांतर तपास सुरू केला.

दरम्यान, १ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, शेंबा येथील दुकान फोडण्याचा प्रयत्न मलकापूर येथील एका इसमाने केला आहे. या माहितीसह तांत्रिक तपासाच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे यांच्या पथकाने मलकापूर शहरातील सायकलपुरा परिसरात तातडीची कारवाई केली.

या कारवाईत शेख साबीर शेख अहमद (वय ३२, रा. सायकलपुरा, मलकापूर, जि. बुलढाणा) यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने २२ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्राम शेंबा येथील ‘सिद्धेश्वर इलेक्ट्रिक अँड रिवाइंडिंग’ दुकानात चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी बोराखेडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक आशिष रोही, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोहेकॉ. विजय वारुळे, अनुपकुमार मेहेर, अमोल वनारे, सतीश नाटेकर, समाधान टेकाळे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस कर्मचारी कैलास ठोंबरे यांचा समावेश होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top