Mahabreaking

[breaking_news]

Theft :गॅरेज बांधकामासाठी ठेवलेल्या १,२०० विटांची चोरी; देऊळगाव राजात अज्ञात चोरट्यांचा धाडसी डाव

Theft : शहरातील सिंदखेड राजा टी-पॉइंट परिसरात असलेल्या गोविंद ऑटो पार्ट्ससमोर गॅरेजच्या नवीन बांधकामासाठी ठेवलेल्या तब्बल १,२०० विटांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

Drunken driving horror
देऊळगाव राजात बांधकाम साहित्यावर चोरट्यांची नजर; १८ हजारांच्या विटा लंपास

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : शहरातील सिंदखेड राजा टी-पॉइंट परिसरात असलेल्या गोविंद ऑटो पार्ट्ससमोर गॅरेजच्या नवीन बांधकामासाठी ठेवलेल्या तब्बल १,२०० विटांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद सारंगधर निंबाळकर (वय ३५, रा. भिवगाव, ता. देऊळगाव राजा) हे मोटार मेकॅनिक असून, सिंदखेड राजा टी-पॉइंट येथील गोविंद ऑटो पार्ट्ससमोर नवीन गॅरेजचे बांधकाम सुरू करण्यासाठी त्यांनी सुमारे २ हजार विटा आणून ठेवल्या होत्या.
दरम्यान, ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.१५ ते ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.४५ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्या ठिकाणाहून १,२०० विटा चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या विटांची अंदाजे किंमत १८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
घटना लक्षात आल्यानंतर गोविंद निंबाळकर यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तोंडी फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा क्रमांक ३६१/२०२६ दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर सानप यांच्याकडे सोपविण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक नागरिकांची चौकशी तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बांधकामासाठी आणलेले साहित्यही आता चोरट्यांच्या निशाण्यावर येत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत असून, अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना बांधकाम साहित्य उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवण्याचे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top