Mahabreaking

[breaking_news]

cash stolen: कोथळीतील भगत महाराज संस्थानात चोरी; चार दानपेट्या फोडून रोकड लंपास

cash stolen: बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव परिसरातील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथळी खुर्द येथील श्री संत भगत महाराज संस्थानात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मुख्य मंदिर व उपमंदिरांमधील चार दानपेट्या लंपास करून त्यातील रोकड चोरून नेल्याची घटना ६ जूनच्या रात्री घडली.

cash stolen

जागृत देवस्थानावर चोरट्यांचा डल्ला; दानपेट्या शेतात फुटलेल्या अवस्थेत आढळल्या

 बबन इंगळे

सायखेड  : बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव परिसरातील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथळी खुर्द येथील श्री संत भगत महाराज संस्थानात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मुख्य मंदिर व उपमंदिरांमधील चार दानपेट्या लंपास करून त्यातील रोकड चोरून नेल्याची घटना ६ जूनच्या रात्री घडली.

या घटनेचा उलगडा ७ जून रोजी सकाळी झाला. परिसरातील एका शेतात तारकंपाउंडचे काम सुरू असताना एक दानपेटी फुटलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता इतर तीन दानपेट्याही फुटलेल्या अवस्थेत सापडल्या. याबाबत भगत महाराजांचे भक्त तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील कोहर यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. चोरीला गेलेल्या चारही दानपेट्या संस्थान परिसरातील विविध मंदिरांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक दानपेटी भगत महाराजांच्या मुख्य मंदिरातील गाभाऱ्यातील होती, तर उर्वरित तीन दानपेट्या गणपती, विठ्ठल-रुक्मिणी आणि संत गजानन महाराज उपमंदिरांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.

दानपेट्यांमधील किती रक्कम चोरीला गेली याचा तपशील अद्याप समोर आलेला नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top