Prataprao Jadhav : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंबंधी वाद उद्भवलेल्या लोणार तालुक्यातील चिखला गावी आज केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट दिली. विविध महापुरुषांनी समानतेचा संदेश दिलेला आहे. परंतु महापुरुषांना समाजात विभागण्याचे काम बंद झाले पाहिजे ,यामुळे हिंदू समाजाचे नुकसान होत आहे ,असे यावेळी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले.

बुलढाणा :छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंबंधी वाद उद्भवलेल्या लोणार तालुक्यातील चिखला गावी आज केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट दिली. विविध महापुरुषांनी समानतेचा संदेश दिलेला आहे. परंतु महापुरुषांना समाजात विभागण्याचे काम बंद झाले पाहिजे ,यामुळे हिंदू समाजाचे नुकसान होत आहे ,असे यावेळी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले.
चिखला प्रकरणातील सर्व दोषींना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. मी याबाबत पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की आरोपींना अटक करत असताना निर्दोष लोकांना वेठीस धरू नये गावातले सामंजस्य कायम राहिले पाहिजे गावातील सर्व समाजाचे लोक पिढ्यानपिढ्या एकत्र गुण्या गोविंदाने नांदत आहेत. काही लोकांनी चूक केली म्हणून त्या संपूर्ण समाजाला दोष देणे चुकीचे आहे. मोजके लोक वाईट प्रवृत्तीचे असतात परंतु त्या समाजातील मोठ्या संख्येने लोक हे सुस्वभावी असतात. राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारात वाढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्वांना मावळे ही उपमा दिली होती. या शब्दामुळे सर्व जाती धर्माचे लोक स्वराज्य उभारणीसाठी एकत्र आले .त्यांच्यात कुठलाही जातीभेद नव्हता, असेही प्रतापराव जाधव म्हणाले.
संजीवनी वाघ या महिलेचे कपडे फाडण्यापर्यंत झालेल्या प्रकार अतिशय निंदनीय आहे. खरे म्हणजे गावातील सर्वांनी एकत्र येऊन समपचाराने शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना करणे आवश्यक होते, परंतु काही वाईट प्रवृत्तीच्या मंडळींनी अप प्रकार केला व संपूर्ण राज्यभर गावाची बदनामी झाली .असे घडायला नको होते. पोलिसांच्या भीतीमुळे गावातील लोक मोठ्या संख्येने बाहेर निघून गेले आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींची नावे जाहीर करावी. म्हणजे गावातून बाहेर गेलेले कुटुंब परत गावात येतील. कुठलाही परिस्थितीत गावागावांमधील सोहर्दचे वातावरण खराब होता कामा नये असेही ते म्हणाले.
यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, आ.सिद्धार्थ खरात, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने, दिलीपराव देशमुख, शिव पाटील तेजनकर, राजूभाऊ काटे, गजानन मापारी पांडुरंग सरकटे, संतोष मापारी, सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण दळवी, संघटनेचे तालुका अध्यक्ष विशाल पाटील जंजाळ, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चिखला घटनेच्या निषेधार्थ डोणगावात कडकडीत बंद; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

