Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

stole five lakh rupees :मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी जमवलेले पाच लाख लंपास करणाऱ्यास कर्नाटकातून अटक

stole five lakh rupees :शेतकऱ्याने मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी जमवलेली रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय सराईत बॅग-लिफ्टरला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथून अटक केली. या कारवाईत चोरलेले संपूर्ण ५ लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

stole five lakh rupees
आंतरराज्यीय बॅग-लिफ्टरच्या मुसक्या आवळल्या: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

बुलढाणा : शेतकऱ्याने मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी जमवलेली रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय सराईत बॅग-लिफ्टरला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथून अटक केली. या कारवाईत चोरलेले संपूर्ण ५ लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी फिर्यादी नितीन जिजेबा पहाड (रा. रिसोड, जि. वाशीम) यांनी आपली मुलगी श्रुती हिचा बुलढाणा येथील राजश्री शाहू कॉलेज येथे बी.ए.एम.एस. (वैद्यकीय) शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाल्याने कॉलेज फी भरण्यासाठी एस.बी.आय. शाखा, मेहकर येथून ५ लाख रुपये रोख रक्कम काढली होती. ही रक्कम त्यांनी आपल्या कारमध्ये ठेवून बुलढाण्याकडे प्रवास केला. दरम्यान, मेहकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियापासून दोन अज्ञात इसमांनी त्यांचा पाठलाग केला. बुलढाण्यात कॉलेज परिसरात कार पार्क करून कॉलेजमध्ये गेल्यानंतर आरोपींनी कारचा काच फोडून आत ठेवलेली ५ लाखांची रक्कम चोरून नेली. या प्रकरणी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे गुन्हा क्रमांक ८०५/२०२५, कलम ३०५ (C), ३(५) BNS 2023 अंतर्गत दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी हे शेतकरी असून, ही रक्कम त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. या चोरीमुळे त्यांना मोठा आर्थिक धक्का बसला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना विशेष पथक स्थापन करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. आरोपी हे आंतरराज्यीय सराईत बॅग-लिफ्टर व कार ग्लास ब्रेकिंग करणारे असल्याचे निष्पन्न झाले. ते मूळ पत्त्यावर न राहता वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी हे कर्नाटक राज्यातील शिवमोगा शहरात वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग पाच दिवस शिवमोगा येथे मुक्काम करून मुख्य आरोपी सुनिल ऊर्फ बालू रामू बोवी (वय ३२, रा. सेकंड क्रॉस, केशवपुरा, भद्रावती, जि. शिवमोगा, कर्नाटक) याला पेस कॉलेज परिसरातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.
कौशल्यपूर्ण चौकशीत त्याने हा गुन्हा आपल्या भाऊ विष्णू रामू बोवी याच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेले संपूर्ण ५ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून विविध राज्यांत त्याच्यावर बॅग-लिफ्टिंगचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा), अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर (स्था.गु.शा. बुलढाणा) यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दीपक लेकुरवाळे, चाँद शेख, गणेश पाटील, पोको गजानन गोरले, पोहेकॉ राजू आडवे, पवन मखमले, ऋषी खंडेराव यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top