Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

action against sand mafia : रेतीमाफीयांवर धडक कारवाई; खडकपूर्णा प्रकल्पात दोन बोटी केल्या जागेवरच नष्ट

action against sand mafia : खडकपूर्णा जलाशय व नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या निर्देशानुसार तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने खडकपूर्णा जलाशयात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटी पकडून त्या जागेवरच नष्ट करण्याची निर्णायक कारवाई केली.

action against sand mafia
महसूल–पोलीस विभागाची सिनगाव जहॉगीर परिसरात संयुक्त कारवाई

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : खडकपूर्णा जलाशय व नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या निर्देशानुसार तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने खडकपूर्णा जलाशयात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटी पकडून त्या जागेवरच नष्ट करण्याची निर्णायक कारवाई केली.
अवैध रेती वाहतूक व उत्खनन प्रतिबंध पथक दि. २९ जानेवारी २०२६ रोजी गस्तीवर असताना सिनगाव जहागीर, गट क्रमांक ३४१ (सिनगाव जहागीर–खल्लाळगव्हाण रस्ता परिसर) येथे खडकपूर्णा जलाशयात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान एक मोठी फायबर बोट व एक छोटी इंजिन बोट रेती उपशासाठी वापरली जात असल्याचे निदर्शनास आले.
पथकाने तत्काळ कारवाई करत दोन्ही बोटी ताब्यात घेऊन त्या किनाऱ्यालगत सुरक्षित ठिकाणी आणल्या व जागेवरच नष्ट केल्या. कारवाईदरम्यान बोटीवर काम करणारे परप्रांतीय मजूर पळून गेले. घटनास्थळी सापडलेले एका मजुराचे आधारकार्ड पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत अवैध रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य नष्ट करण्यात आले. तसेच जलाशयातील रेती उपशामुळे तयार झालेले खड्डे उध्वस्त करण्यात आले असून रेती वाहतुकीसाठी तयार केलेले कच्चे रस्ते तोडून बंद करण्यात आले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या संयुक्त कारवाईत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे (सिंदखेड राजा), तहसीलदार वैशाली डोंगरजाळ (देऊळगाव राजा), नायब तहसीलदार सायली जाधव,मंडळाधिकारी विजय हिरवे (मेहुणा राजा), महसूल सहाय्यक उमेश गरकल, प्रशांत वाघ, ग्राम महसूल अधिकारी संजय हांडे, आकाश खरात, सरीता वाघ, तेजस शेटे, पोलीस कॉन्स्टेबल माधव कुटे, कलीम देशमुख, शिपाई ताठे, महसूल सेवक वैशाली देशमाने, मारुती बंगाळे यांनी सहभाग घेतला. खडकपूर्णा जलाशय व नदीपात्रात अवैध रेती उत्खननास कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top