Mahabreaking

[breaking_news]

sexually assaulted :१० वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या

sexually assaulted : चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करून पसार झालेल्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आले. तब्बल १०५ पोलिसांचे पाच स्वतंत्र पथक, ड्रोन कॅमेरे, श्वानपथक आणि वनविभागाच्या मदतीने दोन दिवस राबविण्यात आलेल्या विशेष शोधमोहीमेनंतर ही कारवाई करण्यात आली.  फरार आरोपीला अखेर अकोला पोलिसांनी सावरगाव परिसरातील दुर्गम जंगलातून अटक करण्यात आली.

sexually assaulted

१०५ पोलिसांची दोन दिवस जंगलात शोधमोहीम; सावरगावच्या दुर्गम जंगलातून आरोपी जेरबंद

राहुल सोनोने

दिग्रस बु : चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करून पसार झालेल्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आले. तब्बल १०५ पोलिसांचे पाच स्वतंत्र पथक, ड्रोन कॅमेरे, श्वानपथक आणि वनविभागाच्या मदतीने दोन दिवस राबविण्यात आलेल्या विशेष शोधमोहीमेनंतर ही कारवाई करण्यात आली.  फरार आरोपीला अखेर अकोला पोलिसांनी सावरगाव परिसरातील दुर्गम जंगलातून अटक करण्यात आली.

धक्कादायक! स्वत:च्या अपहरणाचा केला बनाव, ४० तोळे सोन्याची केली मागणी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आईला दिल्यानंतर तिच्या आईच्या जबानीवरून चान्नी पोलीस स्टेशनमध्ये ५ मे २०२६ रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके, चान्नी पोलीस स्टेशनचे पथक, बाळापूर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांची पथके, पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी, आरसीपी पथक, दोन श्वानपथके आणि चार ड्रोन कॅमेरे यांचा शोधमोहीमेत समावेश करण्यात आला.

सावरगाव, चोंडी, वनदेव, वसाली, नवेगाव, पांगरताटी, झरंडी या वनक्षेत्रासह सावरगाव धरण परिसरात पोलिसांनी दोन दिवस कसून शोध घेतला. आरोपी हा स्थानिक रहिवासी असून त्याला जंगल परिसराची पूर्ण माहिती असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. अखेर गुरुवारी, ७ मे रोजी वनविभागाचे आरएफओ जाधव आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने तसेच सावरगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने आरोपी जगराम गोविंदा आडे (वय ६०, रा. सावरगाव) याला जंगल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात पोलिसांकडून ई-साक्ष, फॉरेन्सिक व्हॅन, घटनास्थळाची व्हिडिओग्राफी, वैद्यकीय तपासणी आदी तांत्रिक तपास पद्धतींचा वापर करण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून कठोर शिक्षा होण्यासाठी पुढील ३० दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र लांडे हे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top