Jalindar Budhavat : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बुलढाणा जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांचा मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील विविध गावांत ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात येत आहे. रविवारी धामणगाव, मासरूळ, गुम्मी, पांगरखेड, मढ, सोयगाव, कुंबेफळ, तरारखेड, इस्लापूर, पाडळी आणि सतगाव येथे सत्कार कार्यक्रम पार पडले.

पक्ष, जात, धर्म विकासाच्या आड येऊ देणार नाही; जालिंदर बुधवत यांची ग्वाही
पंडित सावळे
मासरूळ : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बुलढाणा जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांचा मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील विविध गावांत ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात येत आहे. रविवारी धामणगाव, मासरूळ, गुम्मी, पांगरखेड, मढ, सोयगाव, कुंबेफळ, तरारखेड, इस्लापूर, पाडळी आणि सतगाव येथे सत्कार कार्यक्रम पार पडले.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना जालिंदर बुधवत म्हणाले, “विकासाच्या कामांसाठी आम्ही राजकारणाची जोडे बाजूला ठेवतो. गेल्या ३० ते ३५ वर्षांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत अनेक माणसे जोडता आली. जनमाणसांचे मिळणारे प्रेम हीच आपली खरी दौलत आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
ग्राम सोसायटीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
याप्रसंगी जालिंदर बुधवत यांच्या हस्ते ग्राम सहकारी सोसायटीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन नारळ फोडून करण्यात आले. तसेच, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत अधिकाधिक व्यवहार वाढवून आपल्या परिसरात जिल्हा बँकेची शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
गुम्मी येथील स्मशानभूमीचा प्रश्न आपण हाती घेणार असून, त्यासाठी ग्रामस्थांनी जागेसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बुधवत यांनी केले. विकासकामांच्या बाबतीत पक्ष, जात आणि धर्म यांना कधीही आडवे येऊ देणार नाही. सत्ता असो वा नसो, सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक गजानन धांडे, तालुकाप्रमुख विजय इतवारे, अनिल नरोटे यांच्यासह संबंधित गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व सदस्य, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

