Mahabreaking

[breaking_news]

MLA Kayande : सिंदखेडराजासह बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा; कृषिमंत्र्यांच्या बैठकीत आमदार कायंदे आक्रमक

MLA Kayande :  सिंदखेडराजा मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी, अशी मागणी आमदार मनोज कायंदे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत आमदार कायंदे यांनी सिंदखेडराजा मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे वास्तव शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

 MLA Kayande

शेतकऱ्यांना ८ तास वीज, चारा व सरसकट मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांचा कृषिमंत्र्यांकडे आग्रह

गजानन तिडके

देऊळगाव राजा : सिंदखेडराजा मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी, अशी मागणी आमदार मनोज कायंदे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत आमदार कायंदे यांनी सिंदखेडराजा मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे वास्तव शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी

बैठकीत आमदार मनोज कायंदे यांनी संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची ठाम मागणी केली. तसेच, बुलढाणा जिल्हा दुष्काळाच्या यादीतून वगळल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित आठ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी पुरेशा चाऱ्याची व्यवस्था करावी, तसेच शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व प्रकारची सरसकट मदत देण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्या आमदार कायंदे यांनी बैठकीत मांडल्या.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार

सिंदखेडराजा मतदारसंघातील शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देत, त्यांच्या हक्काच्या मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार मनोज कायंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आपण सदैव कटिबद्ध असून, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top