Mahabreaking

[breaking_news]

dead snake :अंगणवाडी की गोडाऊन? बाभूळगाव जहागीरमध्ये मृत साप आढळल्याने पालकांमध्ये संताप

dead snake : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाभूळगाव जहागीर येथील अंगणवाडी क्र. २ मध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृत साप आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंगणवाडीमध्ये मुलांच्या वापरासाठी असलेल्या जागेत वाटपाचे साहित्य पडून असल्याने या ठिकाणाला गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

dead snake

  चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ? अंगणवाडी क्र. २ मध्ये कुजलेल्या अवस्थेत मृत साप

आगाखान पठाण

बाभूळगाव जहागीर  : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाभूळगाव जहागीर येथील अंगणवाडी क्र. २ मध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृत साप आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंगणवाडीमध्ये मुलांच्या वापरासाठी असलेल्या जागेत वाटपाचे साहित्य पडून असल्याने या ठिकाणाला गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी क्र. २ मध्ये मृत साप कुजलेल्या अवस्थेत पडून होता. सापाच्या दुर्गंधीमुळे हा प्रकार निदर्शनास आला. सापाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तो जिवंत असताना अंगणवाडीत शिरला असता, तर चिमुकल्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती, अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, साप गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी परिसरात असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू होऊन तो कुजलेल्या अवस्थेत पडून राहिला. या घटनेची नेमकी कालमर्यादा आणि संबंधित माहिती अधिकृत तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

अंगणवाडीमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी आणि उपक्रमांसाठी असलेल्या जागेत वाटपाचे साहित्य पडून असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. साहित्याचा साठा झाल्यामुळे अंगणवाडीतील जागा कमी झाली असून, अस्वच्छता आणि अडथळ्यांमुळे साप आत शिरला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि, साप नेमका कशामुळे आणि कोणत्या मार्गाने अंगणवाडीत आला, हे स्पष्ट झालेले नाही.

अंगणवाडी ही लहान मुलांच्या संगोपनाची आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाची जागा असताना तेथे स्वच्छता, सुरक्षितता आणि आवश्यक देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.

मृत साप आढळल्याच्या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या पाल्यांना अंगणवाडीत पाठवावे की नाही, असा संभ्रम काही पालकांमध्ये निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. संबंधित प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top