Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

The birth anniversary of Shri :बोरगाव मंजूत श्रींचा प्रकटदिन उत्साहात; शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

The birth anniversary of Shri : स्थानिक पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मी नगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने श्रींचा १४८ वा प्रकटदिन मोठ्या धार्मिक विधींनी, भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शेकडो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.

The birth anniversary of Shri

बोरगाव मंजू : स्थानिक पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मी नगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने श्रींचा १४८ वा प्रकटदिन मोठ्या धार्मिक विधींनी, भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शेकडो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.

प्रकटदिनाचे औचित्य साधून सकाळी श्रीमद्भागवत गीतेचे सामूहिक पारायण, जलाभिषेक, होम–हवन, महाआरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. श्रींचा जलाभिषेक, होम–हवन व महाआरती मंदिराचे विश्वस्त योगेश इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान, प्रकटदिनानिमित्त आयोजित काल्याचे कीर्तन कीर्तनकार सोहम महाराज काकडे यांच्या वाणीतून रंगले. कीर्तनानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. महाप्रसाद सेवेची व्यवस्था मंदार योगेश इंगळे यांच्या वतीने करण्यात आली होती. प्रकटदिन उत्सव यशस्वी होण्यासाठी संत गजानन महाराज सेवा समिती, महिला व पुरुष सेवाधारी मंडळ तसेच भाविकांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top