Mahabreaking

[breaking_news]

Technology opens doors :ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाची दारे खुली; माजी विद्यार्थ्याने आयोजित केली रोबोटिक्स कार्यशाळा

Technology opens doors :ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेच्या एका माजी विद्यार्थ्याने पुढाकार घेत आरेगाव व मादनी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळांमध्ये रोबोटिक्स व ड्रोन कार्यशाळेचे आयोजन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

Technology opens doors
डोणगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेच्या एका माजी विद्यार्थ्याने पुढाकार घेत आरेगाव व मादनी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळांमध्ये रोबोटिक्स व ड्रोन कार्यशाळेचे आयोजन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; तरोडा येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजनेचे संचालक तथा उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, आरेगाव येथील माजी विद्यार्थी सोहम वायाळ यांच्या विशेष प्रयत्नातून ५ मार्च रोजी ही कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर येथील ‘रोबोनिस्ट टेक सोल्यूशन’ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेदरम्यान तज्ञ मार्गदर्शकांनी रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती देत विविध प्रात्यक्षिके सादर केली. उडणारे ड्रोन, सेन्सरच्या साहाय्याने सुरू होणारे दिवे तसेच इतर तांत्रिक उपकरणांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत रोबोट्स प्रत्यक्ष हाताळून पाहिले आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता वाढून नवोपक्रमशीलतेला चालना मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय जुमडे, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्याने शाळेच्या प्रगतीसाठी घेतलेला हा पुढाकार परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच मादनी येथील शाळेतही शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तांत्रिक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top