Mahabreaking

[breaking_news]

Sarjerao Deshmukh: शिक्षकांनी समाजाशी नाते घट्ट करून समर्पित भावनेने कार्य करावे : सर्जेराव देशमुख

Sarjerao Deshmukh: काही वर्षांपूर्वी शिक्षक हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक होता. शिक्षक गावातच राहत असल्यामुळे तो गावाचे पोलीस स्टेशन, समुपदेशक आणि आरोग्य केंद्र अशा विविध भूमिका पार पाडत असे. गावातील सोयरीकीपासून भावकीच्या वाटणीपर्यंतची अनेक कामे शिक्षकाच्या उपस्थितीशिवाय होत नसत. त्या काळातील शिक्षक पूर्णतः समाजाला समर्पित भावनेने कार्य करीत असल्याने समाजही अशा शिक्षकांना डोक्यावर घेत असे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी केले.

Sarjerao

 मराठी शाळांची घटती पटसंख्या चिंताजनक; शिक्षकांनी समाजाभिमुख होण्याची गरज

पंडित सावळे

 मासरूळ : काही वर्षांपूर्वी शिक्षक हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक होता. शिक्षक गावातच राहत असल्यामुळे तो गावाचे पोलीस स्टेशन, समुपदेशक आणि आरोग्य केंद्र अशा विविध भूमिका पार पाडत असे. गावातील सोयरीकीपासून भावकीच्या वाटणीपर्यंतची अनेक कामे शिक्षकाच्या उपस्थितीशिवाय होत नसत. त्या काळातील शिक्षक पूर्णतः समाजाला समर्पित भावनेने कार्य करीत असल्याने समाजही अशा शिक्षकांना डोक्यावर घेत असे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी केले.

पिंपळगाव देवी केंद्राच्या शैक्षणिक परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या शैक्षणिक परिषदेला केंद्रातील १३ शाळांमधील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

पुढे बोलताना सर्जेराव देशमुख म्हणाले की, आजही समर्पित भावनेने कार्य करणारा शिक्षक कौतुकास पात्र ठरतो. पूर्वी चौथी किंवा सातवीपर्यंत शिक्षण घेतलेला शिक्षक आजच्या शिक्षकांप्रमाणे संगणक किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानाने सुसज्ज नसला, तरी तो विचारांनी आणि संस्कारांनी समृद्ध होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या वैचारिक पायाभरणीत त्या काळातील शिक्षकांचे मोठे योगदान आहे.

आज उच्चशिक्षित, बुद्धिमान आणि स्पर्धा परीक्षेतून निवड झालेले शिक्षक कार्यरत असतानाही मराठी शाळांची पटसंख्या झपाट्याने घटत आहे. तसेच लेखन-वाचन करता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याची बाब चिंताजनक आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबतच समाजाशीही आपले नाते अधिक दृढ करून समाजाला समर्पित भावनेने कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेत विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ईश्वर गाढवे, गोपाल पवार आणि सारिका शेळके यांनी मार्गदर्शन केले.

शैक्षणिक परिषदेचे आयोजन छत्रपती शिवाजी विद्यालय, सिंदखेड येथे करण्यात आले होते. परिषद यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर गाढवे यांनी केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top