Mahabreaking

[breaking_news]

 Kamlesh Khillare :तथागत बुध्दांनी धर्माची कर्मकान्डाची चौकट तोडली- प्रा.कमलेश खिल्लारे

Kamlesh Khillare :तथागत बुध्दांच्या एवढा प्रगल्भ परिपूर्ण बुद्धिमान माणूस जगाने अद्याप पाहिला नाही. कारण बुद्ध धम्म सांगताना सदाचरनाला महत्व ते देतात.माणूस आणि माणसाशी त्याचे नाते हे त्यांच्या धम्माचे केंद्रबिंदू आहे.इतर धर्मात ईश्वराला स्थान आहे पण बुद्धाने नैतिकतेला स्थान दिलेलं आहे.माणसाला माणसाचा जगणं शिकवणारे आणि अडलेल्यांना आधार देणारे बुद्ध नेहमी म्हणत की मी प्रेषित नाही हे सांगण्यातच खरी बुद्धाची थोरवी आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक कमलेश खिल्लारे यांनी केले.

 Kamlesh Khillare

नारायणगाव येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी

गजानन भालेकर

 धोत्रा नंदाई : तथागत बुध्दांच्या एवढा प्रगल्भ परिपूर्ण बुद्धिमान माणूस जगाने अद्याप पाहिला नाही. कारण बुद्ध धम्म सांगताना सदाचरनाला महत्व ते देतात.माणूस आणि माणसाशी त्याचे नाते हे त्यांच्या धम्माचे केंद्रबिंदू आहे.इतर धर्मात ईश्वराला स्थान आहे पण बुद्धाने नैतिकतेला स्थान दिलेलं आहे.माणसाला माणसाचा जगणं शिकवणारे आणि अडलेल्यांना आधार देणारे बुद्ध नेहमी म्हणत की मी प्रेषित नाही हे सांगण्यातच खरी बुद्धाची थोरवी आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक कमलेश खिल्लारे यांनी केले.

नागणगांव येथे दरवर्षी प्रमाणे बुद्ध जयंती 1 मे रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून महिला आणि पुरुष जयघोष करत विहारा पर्यंत आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या हस्ते प्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले.. विचारपीठावरील मान्यवरांनी दिप प्रज्वलीत करून महापुरुष्याच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण केले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक वादी विचारवंत प्राध्यापक कमलेश खिल्लारे हे होते तर विचार पिठावर आदरणीय भंतेजी,अनिस कार्याध्यक्ष प्रदीपजी हिवाळे, प्राचार्य टेकाळे, माजी सरपंच रामेश्वर वायाळ, सत्यशोधक गोरे सर,मलके अप्पा लंगोटे, तेजराव बनसोडे उपस्थित होते..

मान्यवरांच्या स्वागता नंतर पंचक्रोसीतील धम्मासाठी सतत कार्यरत असणाऱ्या तीन जोडप्यांचे साडी कपडे देत मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.  रामेश्वर वायाळ यांनी कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवसाचे महत्त्व सांगत बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही कारण युद्ध नाही तर बुद्धच जगाला शांतीचा संदेश देऊ शकतो प्रेमाने एकमेकांसोबत जगण्यासाठी हात देऊ शकतो असे विचार व्यक्त केले..

बौद्ध धर्मात भोजनदानाचे महत्त्व खूप आहे हे पटल्यामुळेच जालना येथे राहत असलेले तेजराव बनसोडे पती, पत्नी आणि त्यांच्या मुलाने पंचक्रोशीतील समाजाला एकत्रित बोलवत भोजनदान दिले. सर्वांनी त्यांचेही स्वागत सन्मान करत त्यानां साधुवाद दिला. संचालन  साहित्यिक कडूबा बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने महिला युवावर्ग आणि बांधव उपस्थित होते सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला आणि आनंदात कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top