Mahabreaking

[breaking_news]

Anjuman Junior College :अंजुमन ज्युनिअर कॉलेज, खामगावचा बारावीचा निकाल शंभर टक्के

Anjuman Junior College : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी (HSC) परीक्षेचा निकाल २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात खामगाव येथील अंजुमन मुफीदुल इस्लाम संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या अंजुमन ज्युनिअर कॉलेजने उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के (100%) निकालाची परंपरा कायम राखली आहे.

Anjuman Junior College

जाकिर अहमद

बाळापूर  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी (HSC) परीक्षेचा निकाल २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात खामगाव येथील अंजुमन मुफीदुल इस्लाम संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या अंजुमन ज्युनिअर कॉलेजने उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के (100%) निकालाची परंपरा कायम राखली आहे.

विज्ञान शाखेत एकूण 115 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 114 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि सर्व 114 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य (डिस्टिंक्शन) मिळवले, 43 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 65 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर 2 विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी मिळवली.

कला शाखेत 47 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि सर्व 47 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचाही निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये 1 विद्यार्थ्याने विशेष प्रावीण्य, 9 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 28 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर 9 विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी मिळवली.

या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. वकारुल हक खान, ताजउद्दीन हमदुले आणि तौफीक अहमद यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य एहफाजुल हक खान, उपप्राचार्य उमेर मोहम्मद खान, पर्यवेक्षक शकील अहमद, सर्व शिक्षकवृंद तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top