Mahabreaking

[breaking_news]

Students welcomed :ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; स्वखर्चातून गणवेश व दप्तरांचे वाटप

Students welcomed : नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दे. भ. श्री हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (उर्फ बाबुराव पाटील विद्यालय), लोणी गवळी येथे विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पवर्षाव करून आणि उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखदार स्वागत करण्यात आले. तब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजल्याने आणि मित्र-मैत्रिणींची भेट झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

Students welcomed

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांचा सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तर भेट

डोणगाव : नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दे. भ. श्री हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (उर्फ बाबुराव पाटील विद्यालय), लोणी गवळी येथे विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पवर्षाव करून आणि उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखदार स्वागत करण्यात आले. तब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजल्याने आणि मित्र-मैत्रिणींची भेट झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

add

यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या स्वखर्चातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि दप्तरांचे वाटप केले. शिक्षकांच्या या उपक्रमाचे पालकांसह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या निनादात आणि पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता.

यानंतर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील व प्राचार्य सुरेश हिवरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बिस्किटांच्या पुड्या, शालेय गणवेश आणि दप्तरांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पगारातून विद्यार्थ्यांसाठी गणवेश व दप्तर उपलब्ध करून देणे, हा समाजासमोर आदर्श निर्माण करणारा उपक्रम असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नवीन पुस्तके, नवीन गणवेश, नवीन दप्तर आणि शिक्षकांकडून मिळालेल्या प्रेमळ स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अत्यंत आनंददायी व संस्मरणीय ठरला.या कार्यक्रमास गावातील पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top