Mahabreaking

[breaking_news]

Students welcomed :गुलाबपुष्पांचा वर्षाव, बँडच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत; परशुराम नाईक विद्यालयात प्रवेशोत्सव दिमाखात

Students welcomed : येथील परशुराम नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नव्या शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रवेशोत्सव आनंददायी वातावरणात पार पडला.

  Students welcomed

  नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; परशुराम नाईक विद्यालयात प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचा सन्मान

बोरगाव मंजू : येथील परशुराम नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नव्या शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रवेशोत्सव आनंददायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य एस. जी. बोरगावकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य अजय नाईक, सुधाकर टोपरे, अतुल नाईक, पत्रकार संजय तायडे, विशेष शिक्षिका आरती बंड, शाळेचे प्राचार्य मनोज आगरकर, उपमुख्याध्यापक शंकर भदे तसेच पर्यवेक्षक प्रा. रमेश भड उपस्थित होते.

प्रवेशोत्सवानिमित्त शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराची पताका, स्वागत फलक, तोरणे व आकर्षक रांगोळीने सजावट करण्यात आली होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. बँड पथकाच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यानंतर माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी संगीताच्या साथीने स्वागतगीत सादर केले. नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. यावेळी दिव्यांग विद्यार्थी तनुज वानखडे यांचे करण्यात आलेले विशेष स्वागत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करून त्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पत्रकार संजय तायडे व विशेष शिक्षिका आरती बंड यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात एस. जी. बोरगावकर यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधुरी दिपके यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मनोज आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेशोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top