Students impressive drill : शहरालगत असलेल्या ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीतावर उत्कृष्ट कवायत सादर करत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कवायतीतून देशभक्तीचा जोश; ग्रामविकास विद्यालयात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात
अकोला : शहरालगत असलेल्या ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीतावर उत्कृष्ट कवायत सादर करत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरीही उत्साहात काढण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या परिसरात आयोजित मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे माजी पोलीस पाटील अजबराव शिरसाठ होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच आगाखान पठाण उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे उपसरपंच शाहरुख पठाण, ग्रामपंचायत सदस्य अॅड. विनीत शिरसाट, दिपाली इंगळे, किरण ताई देशमुख, प्राचार्य अपर्णा रिंगणे, शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य अनिल इंगळे, ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सचिव उन्मेष कृष्णराव रिंगणे, सामाजिक कार्यकर्ता अतिक पठाण, डॉ. साजिद खान पठाण, पत्रकार प्रदीप देशमुख, शाळेचे माजी विद्यार्थी दिनेश गावंडे, किशोर गावंडे, फिरोज खान पठाण, टाले सर, शिरसाट सर, धोटे सर, आडे सर, सिद्धार्थ गुडदे, चांदशह, शेख साजिद यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अजबराव शिरसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर उत्कृष्ट कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
मान्यवरांचा सत्कार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक निलेश गावंडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक हरिदास आपोतीकर यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, ग्रामवासी, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा शाळा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

