Mahabreaking

[breaking_news]

Environmental Awareness : कस्तुरबा कॉन्व्हेंटमध्ये ‘जागर पर्यावरणाचा’; विद्यार्थी-शिक्षकांनी घेतली संवर्धनाची शपथ

Environmental Awareness : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कस्तुरबा कॉन्व्हेंट, देऊळगाव राजा येथे देऊळगाव राजा हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या पुढाकारातून ‘जागर पर्यावरणाचा’ हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमातून विद्यार्थी व शिक्षकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासोबतच वन्यजीव संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

‘Environmental Awareness

 ‘शुभेच्छा बॅनरवर नकोत, वृक्षाच्या रूपाने जिवंत राहू द्या’; मेहेत्रे यांचा पर्यावरणपूरक संदेश

देऊळगाव राजा : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कस्तुरबा कॉन्व्हेंट, देऊळगाव राजा येथे देऊळगाव राजा हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या पुढाकारातून ‘जागर पर्यावरणाचा’ हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमातून विद्यार्थी व शिक्षकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासोबतच वन्यजीव संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

वृक्षपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात वनपरिक्षेत्र अधिकारी कु. पल्लवी बाराते, वनपाल श्री. जी. के. कायंदे, पर्यावरणमित्र वनश्री जनाबापू मेहेत्रे, मुख्याध्यापिका सौ. एकविरा कुलकर्णी, शिक्षक श्री. मनीष गुप्ता, सर्पमित्र व वन्यजीव रक्षक वैभव लाखोले, कृष्णा राऊत, किरण जुमडे, तसेच हरित सैनिक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षपूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

वैभव लाखोले यांनी वन्यजीव संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. श्री. जी. के. कायंदे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले, तर सौ. एकविरा कुलकर्णी यांनी केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणेही तितकेच गरजेचे असल्याचे सांगितले.

 

‘शुभेच्छा बॅनरवर नकोत; वृक्षाच्या रूपाने जिवंत राहू द्या’

पर्यावरणमित्र वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, राष्ट्रीय सण-उत्सव किंवा स्मृतिदिन अशा प्रसंगी शुभेच्छांचे बॅनर लावण्याऐवजी एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची पर्यावरणपूरक परंपरा सुरू करावी, असे आवाहन केले. “शुभेच्छा बॅनरवर नकोत; त्या वृक्षाच्या रूपाने जिवंत राहू द्या,” असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांनी दिला.

 

विद्यार्थ्यांना रोपे व बियांचे वाटप

यावेळी विद्यार्थ्यांना फळझाडांची रोपे तसेच देशी वृक्षांच्या बियांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांना जनाबापू मेहेत्रे यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. अध्यक्षीय मनोगतात कु. पल्लवी बाराते यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावे एक झाड लावून त्याचे नियमित संगोपन करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार श्री. मनीष गुप्ता यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाची जाणीव रुजविणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top