Mahabreaking

[breaking_news]

Jalindhar Budhwat :सोशल मीडियावर नव्हे, जनतेत उतरा-शिवसेना पदाधिकाऱ्यांना जालिंधर बुधवत यांचे आवाहन

Jalindhar Budhwat : आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटन बळकटीकरण आणि जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून पक्ष वाढत नाही, तर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन संपर्क वाढवावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले.

 

Jalindhar Budhwat
ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत निवडणुकांची तयारी सुरू; (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)ची जिल्हा बैठक

बुलढाणा : आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटन बळकटीकरण आणि जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून पक्ष वाढत नाही, तर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन संपर्क वाढवावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले.

shivsena
रविवारी (१२ जुलै) बुलढाणा येथील रेसिडेन्सी येथे झालेल्या जिल्हा पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. बैठकीत पक्षविस्तार, निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेत बूथ लेव्हल एजंटची भूमिका, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, पक्षाच्या राज्य प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके, सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, दत्ता पाटील, वसंतराव भोजने, जिल्हा संघटक सुमित सरदार, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, शुभम पाटील, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, वसंतराव झाल्टे, गजानन धांडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जालिंधर बुधवत यांनी राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीने एकत्रितपणे भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, रुग्णांना फळवाटप आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्याचा उल्लेख करत, जनतेने दिलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. काही लोक पक्ष सोडून गेल्याने शिवसेना कमकुवत होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्य प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके यांनी पक्षातील काही आमदार-खासदारांनी साथ सोडली असली, तरी सामान्य शिवसैनिक आजही पक्षाशी निष्ठावान असल्याचे सांगितले. “सत्तेचे राजकारण बदलत असते; मात्र निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष पुन्हा उभारी घेईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीच्या प्रारंभी प्रा. सिद्धेश्वर आंधळे यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील आणि डी. एस. लहाने यांनीही कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळकटी, बूथस्तरावरील कामकाज आणि निवडणूक तयारीबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीस जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख तसेच विविध अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top