Mahabreaking

[breaking_news]

Speeding two-wheeler :भरधाव दुचाकीला हरणाची जोरदार धडक  ; दोन मजूर गंभीर जखमी

Speeding two-wheeler : भरधाव दुचाकीला हरिण धडकल्याने दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना  राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाडा नजीक  रविवारी घडली.

Speeding two-wheeler

 महामार्गावर वन्यप्राण्यांचा धोका वाढला; पैलपाडा येथे भीषण अपघात

संजय तायडे

बोरगाव मंजू : भरधाव दुचाकीला हरिण धडकल्याने दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना  राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाडा नजीक  रविवारी घडली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील सोनाळा येथील प्रशिक संजय खडे आणि उमेश रमेश तायडे हे दोघे रोजगारासाठी काटेपूर्णा येथे दुचाकी (क्र. एमएच-३० सीए-२२३४) वरून जात होते. दरम्यान, पैलपाडा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर अचानक समोर आलेल्या हरिणाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वीर भगतसिंग पथकाच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी प्रशिक खडे आणि उमेश तायडे यांना प्राथमिक मदत करून पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यास सहकार्य केले. अपघाताची तीव्रता एवढी होती की, जखमी दुचाकीस्वारांच्या पायांवर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन्यप्राण्यांचे कळप वारंवार महामार्गावर येत असल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच अपघातातील जखमींना उपचारासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top