Speeding two-wheeler : गतिरोधकावर नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकीची टिप्पर धडक बसल्याने युवक ठार झाला. ही घटना रविवारी (१५ जून) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. दर्शन नंदलाल जैन (रा. मोताळा) असे मृत युवकाचे नाव आहे.

वाघजाळ फाट्यावर भीषण अपघात; गतिरोधकावर नियंत्रण सुटले अन् काळाने घातला घाला
मोताळा : गतिरोधकावर नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकीची टिप्पर धडक बसल्याने युवक ठार झाला. ही घटना रविवारी (१५ जून) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. दर्शन नंदलाल जैन (रा. मोताळा) असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्याकडून मोताळ्याकडे एक टिप्पर येत होते. दरम्यान, वाघजाळ फाट्यावरील गतिरोधकाजवळ मोताळा येथील दर्शन जैन यांच्या दुचाकीची टिप्परला जोरदार धडक बसली. या अपघातात दर्शन जैन गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमी दर्शन जैन यांना तातडीने बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातग्रस्त टिप्पर व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेऊन बोराखेडी पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केली आहे. पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मोताळा परिसरात हळहळ व्यक्त होत असून दर्शन जैन यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

