A golden opportunity for graduates :वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) मान्यताप्राप्त अॅडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (ADM LT – PGDMLT) हा अभ्यासक्रम पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.या अभ्यासक्रमासाठी स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा येथे प्रवेश देणे सुरू झाले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक डॉ.सचिन सुपे यांनी दिली.

क्लिनिकल लॅब सुरू करण्याची संधी; १००% प्रशिक्षण व प्लेसमेंटसह PGDMLT अभ्यासक्रमाला मागणी
बुलढाणा : वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) मान्यताप्राप्त अॅडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (ADM LT – PGDMLT) हा अभ्यासक्रम पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.या अभ्यासक्रमासाठी स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा येथे प्रवेश देणे सुरू झाले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक डॉ.सचिन सुपे यांनी दिली.
दीड वर्ष कालावधीचा व तीन सेमिस्टरमध्ये पूर्ण होणारा हा पूर्णवेळ अभ्यासक्रम बी.एस्सी. (CBZ) किंवा मायक्रोबायोलॉजी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित लॅब तंत्रज्ञांची वाढती मागणी लक्षात घेता या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या अभ्यासक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र (Registration) मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शासकीय तसेच खाजगी रुग्णालये, निदान केंद्रे, पॅथॉलॉजी लॅब आणि विविध आरोग्य संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तसेच इच्छुक विद्यार्थ्यांना स्वतःची क्लिनिकल लॅब सुरू करून स्वयंरोजगार निर्माण करण्याचाही मार्ग खुला होतो.
स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधांसह गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. प्रशस्त संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब, डिजिटल प्रोजेक्टरयुक्त स्मार्ट क्लासरूम आणि नियमित प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य विकसित केले जाते. अभ्यासक्रमादरम्यान विविध रक्त तपासणी शिबिरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सहली, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम आणि नेतृत्व कौशल्यवर्धन उपक्रम राबविले जातात. अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक तसेच तज्ज्ञ कर्मचारीवर्ग विद्यार्थ्यांना उद्योग व आरोग्य क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षण देतात, असे संस्थापक डॉ.सचिन सुपे यांनी सांगितले.

रोजगाराबरोबरच स्वयंरोजगारही मिळतो
संस्थेच्या वतीने १०० टक्के प्रशिक्षण आणि प्लेसमेंटसाठी विशेष प्रयत्न केले जातात. रोजगाराबरोबरच स्वयंरोजगारासाठीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाते. प्रवेशासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा किंवा ठरावीक टक्केवारीची अट नसून थेट प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे. अत्यल्प शुल्क, शुल्क भरण्यासाठी सवलत आणि बँकांकडून शैक्षणिक कर्जाची सुविधा यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमाचा लाभ घेता येतो. अभ्यासक्रमाची परीक्षा शासनामार्फत घेतली जाते. यशस्वी विद्यार्थ्यांना शासनाची राजमुद्रा असलेले प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. आरोग्य क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी हा अभ्यासक्रम रोजगार, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाची संधी ठरत असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
प्रवेशासाठी महाविद्यालयात करा संपर्क, मोजक्याच जागा शिल्लक
स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा
वानखेडे ले-आऊट,
डॉ. मेहेत्रे हॉस्पिटल जवळ,
रेणुका टायपिंग समोर, बुलडाणा
अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9422945811

