Mahabreaking

[breaking_news]

Milk Tanker Hits Scooter :भरधाव दूधवाहू गाडीची स्कुटीला धडक; दोन जखमी, चालक फरार

Milk Tanker Hits Scooter :दुधाची वाहतुक करणार्या भरधाव वाहनाने स्कुटीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाले. ही घटना तालुक्यातील रोहणा फाटा ते किनगाव राजा  दरम्यान १२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात  स्कुटीचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात 25 एप्रिल रोजी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

देऊळगाव राजात अपघात; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

गजानन तिडके

 देऊळगाव राजा : दुधाची वाहतुक करणार्या भरधाव वाहनाने स्कुटीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाले. ही घटना तालुक्यातील रोहणा फाटा ते किनगाव राजा  दरम्यान १२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात  स्कुटीचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात 25 एप्रिल रोजी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विनोद प्रकाश काकडे (वय २६, रा. मेहनाराजा, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या मित्रासह स्कुटीवरून जात असताना दूध वाहतूक करणारी महिंद्रा कंपनीची सुप्रो (क्रमांक MH 28 BB 8712) ही गाडी भरधाव व निष्काळजीपणे चालवत स्कुटीला जोरात धडक दिली. या धडकेत फिर्यादी व त्यांचा मित्र दोघेही जखमी झाले असून, स्कुटीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात अप क्र. १८७/२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याची नोंद पोलीस कर्मचारी निलीमा जाधव यांनी केली असून, पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात  पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top