Attacker of Nandura Tehsildar : नांदुरा तहसीलदारांवर टिप्पर पकडल्याच्या रागातून हल्ला करणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासातच गजाआड केले. त्याच्याकडून पोलिसांनी पाच लाख एक हजार रुपयांचा एवजही जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : सावंगी भगत येथून केली अटक
बुलढाणा : नांदुरा तहसीलदारांवर टिप्पर पकडल्याच्या रागातून हल्ला करणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासातच गजाआड केले. त्याच्याकडून पोलिसांनी पाच लाख एक हजार रुपयांचा एवजही जप्त केला आहे.
नांदुरा तहसील कार्यालयातील तहसीलदार अजीतराव जंगम यांच्या कक्षात आरोपी समाधान भगवान मोरे रा. बुलढाणा व इतर एकाने 23 एप्रिल रोजी प्रवेश केला होता. तसेच रेतीचे पकडलेले टिप्पर एमएच 28 एबी 7638 वर कारवाई का केली यावरून तहसीलदार जंगम व नायब तहसीलदार श्रीशैल सुभाष व्हट्टे यांच्याबरोबर वाद घातला. तसेच जंगम यांच्यावर लोखंडी वस्तूने वार केले. चापटा व बुक्यांनी मारहाण व लोटपोट केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी श्रीशैल व्हट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी समाधान मोरे व इतर एकाविरुदध्द गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर आरोपी व त्याचा साथीदार असे ताब्यातील वाहनातून घटनास्थळवरुन पळून गेले होते. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सदर गुन्ह्याची गंभीरता आणि संवेदनशिलता लक्षात घेऊन गुन्ह्यातील आरोपीचा तात्काळ शोध घेऊन अटक करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने, पोनि. सुनिल अंबुलकर यांनी नमुद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी स्था.गु. शाखेचे 03 पथके स्थापन करुन त्यांना वरिष्ठांच्ये निर्देशांप्रमाणे आरोपीचा त्वरीत शोध घेऊन अटक करणेबाबत सुचित केले.
सदर अनुषंगाने, दि.24/04/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की, वरील गुन्ह्यातील आरोपी समाधान मोरे हा पो.स्टे. साखरखेर्डा हद्दीतील ग्राम सावंगी भगत येथे लपून आहे. सदर माहितीच्या आधारे पोनि. सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पो.स्टे. साखरखेर्डा हद्दीत ग्राम सावंगी भगत येथे तात्काळ कार्यवाही करुन आरोपी समाधान भगवान मोरे वय 52 वर्षे, रा. सम्राट अशोक नगर, बुलढाणा ता. बुलढाणा यास मोठ्या शिताफीने केवळ 24 तासांचे आतमध्ये पकडले. नमुद आरोपी कडून स्टिलचा चाकू किं.500/-रु , लोखंडी कोयता किं.500/-रु. , विनानंबर क्रेटा गाडी किं.5,00,000/-रु. असा एकूण 5,01,000/-रु.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी समाधान भगवान मोरे वय 52 वर्षे, रा. सम्राट अशोकनगर, बुलढाणा यास पो.स्टे. नांदूरा यांचे ताब्यात देण्यात आले. वि. न्यायालय नांदूरा यांनी आरोपी समाधान मोरे रा. बुलढाणा याचा दि. 27/04/2026 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. नांदूरा करीत आहेत.
ही कारवाई निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगांव, अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि. यशोदा कणसे, पोउपनि, अविनाश जायभाये, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, शरद गिरी, राजू टेकाळे, चाँद शेख, जगदेव टेकाळे, गणेश पाटील, विजय वारुळे, पोकॉ. अमोल अंभोरे, मंगेश सनगाळे, चापोहेकॉ. विकास देशमुख, समाधान टेकाळे नेमणूक स्थागुशा. बुलढाणा, सपोनि. गजानन कारेवाड पो.स्टे. साखरखेर्डा, पोहेकॉ. राजू आडवे तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांच्या पथकाने केली.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

