Sangeeta Munde Elected Sarpanch : गत अनेक ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करण्याची परंपरा कायम असून यंदाही धोत्रा नंदाई ग्रामस्थांनी ‘एक गाव, एक नेतृत्व’ या सूत्रावर ठाम राहत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा निवडणूक बिनविरोध पार पाडत एकोपा दाखवून दिला.सरपंचपदी संगीता रामदास मुंडे यांची अविरोध निवड करण्यात आली.

गजानन भालेकर
धोत्र नंदाई : गत अनेक ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करण्याची परंपरा कायम असून यंदाही धोत्रा नंदाई ग्रामस्थांनी ‘एक गाव, एक नेतृत्व’ या सूत्रावर ठाम राहत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा निवडणूक बिनविरोध पार पाडत एकोपा दाखवून दिला.सरपंचपदी संगीता रामदास मुंडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी यंदा केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अविरोध झाली. सदस्य पदासाठी नऊ जागा कायम ठेवण्यात आल्या असून, सर्व निवडी एकमताने करण्यात आल्या आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी एकत्रित निर्णय घेत ही निवडणूक अविरोध करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी अडीच वर्षांसाठी जिजा इंद्रजीत मुंडे या बिनविरोध सरपंच होत्या. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काही काळ उपसरपंच रंजना विष्णू गीते यांनी कारभार सांभाळला.
ठरलेल्या नियोजनानुसार आता संगीता रामदास मुंडे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी एकमताने घेतलेल्या या निर्णयामुळे गावात समाधानाचे वातावरण असून, विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धोत्र नंदाई ग्रामस्थांनी पुन्हा एकदा लोकशाही पद्धतीने एकमत साधत आदर्श घालून दिला आहे.

