Mahabreaking

[breaking_news]

Speeding container :भरधाव कंटेनरने कारला कट मारला; देऊळगाव राजात ५० हजारांचे नुकसान

Speeding container : शहरातील मातृदर्शन अर्बन बँकेसमोर भरधाव व निष्काळजीपणे कंटेनर चालविताना एका चालकाने दारूच्या नशेत महिंद्रा XUV 3XO कारला धडक देऊन तिचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री घडली. धडक दिल्यानंतर कंटेनर न थांबविता चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Speeding container

नशेत वाहन चालवून कारचे नुकसान; कंटेनरचालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : शहरातील मातृदर्शन अर्बन बँकेसमोर भरधाव व निष्काळजीपणे कंटेनर चालविताना एका चालकाने दारूच्या नशेत महिंद्रा XUV 3XO कारला धडक देऊन तिचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री घडली. धडक दिल्यानंतर कंटेनर न थांबविता चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सत्यजीत गबाजी कुटे (वय २६, रा. सिव्हील कॉलनी, देऊळगाव राजा) हे कंप्युटर क्लासेस चालवितात. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास ते मातृदर्शन अर्बन बँकेसमोर असताना आरोपी राजपालसिंग सरदारसिंग ठाकुर (वय ५७, रा. बिरहरू, ता. किरागढ, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) हा टाटा कंटेनर क्रमांक HR-47-G-8005 घेऊन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवित तेथून जात होता.

आरोपी चालकाने दारूचे सेवन केले असल्याने तो नशेत कंटेनर वाकड्या-तिकड्या पद्धतीने चालवीत असल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. याचवेळी कंटेनरने फिर्यादी यांच्या ताब्यातील महिंद्रा XUV 3XO क्रमांक MH-28-CC-2612 या कारच्या उजव्या बाजूला, मागील डिक्कीच्या साइडला कट मारला. या धडकेत कारचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

घटनेनंतर आरोपीने कंटेनर थांबविला नाही. अपघातस्थळी न थांबता तो कंटेनरसह तेथून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर फिर्यादीने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात धाव घेत तोंडी रिपोर्ट दिला. तसेच संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी अप क्रमांक ४१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५, १३४ व १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पोहेकॉ समाधान गिते (ब.नं. १९७३) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ गणेश जायभाये (ब.नं. १०९०) यांनी केली.

दरम्यान, अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाचा शोध घेण्यासह घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top