Mahabreaking

[breaking_news]

Farmer dies :जवळखेड शिवारात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; देऊळगाव राजा पोलिसांत मर्ग दाखल

Farmer dies : तालुक्यातील जवळखेड शिवारातील शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मधुकर कडुबा कायंदे (वय ४५, रा. उंबरखेड, ता. देऊळगाव राजा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Speeding container

 शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला सर्पदंश; उपचारापूर्वीच मृत्यू

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यातील जवळखेड शिवारातील शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मधुकर कडुबा कायंदे (वय ४५, रा. उंबरखेड, ता. देऊळगाव राजा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर कायंदे हे १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान जवळखेड शिवारातील आपल्या शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, शेतालगत असलेल्या शरद शेषराव कायंदे यांनी दुपारी सुमारे १.३० वाजता मधुकर यांचे भाऊ रामेश्वर कडुबा कायंदे यांना फोन करून मधुकर यांना शेतात साप चावल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच रामेश्वर कायंदे हे मोटारसायकलने जवळखेड शिवारातील शेतात पोहोचले. त्यावेळी मधुकर कायंदे हे शेतात बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले. त्यानंतर रामेश्वर कायंदे व शरद शेषराव कायंदे यांनी मधुकर यांना मोटारसायकलवरून तातडीने ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा येथे उपचारासाठी आणले.

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मधुकर कडुबा कायंदे यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत रामेश्वर कडुबा कायंदे यांच्या तोंडी रिपोर्टवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायमी मर्ग क्रमांक ३७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका विश्वनाथ काकड (बन नं. २७६) करीत आहेत. मर्ग दाखल अधिकारी म्हणून ASI निलीमा जाधव (बन नं. ८३१) यांनी कार्यवाही केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top