Mahabreaking

[breaking_news]

ICI Education :NEET च्या बदलत्या दडपणातही आय.सी.आय. एज्युकेशनची विद्यार्थिनी तनुजा मोगल हिचे नेत्रदीपक यश

ICI Education :”जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन लाभले तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आभाळालाही गवसणी घालता येते,” हे देऊळगाव राजा येथील एका सामान्य कुटुंबातील मुलीने सिद्ध करून दाखवले आहे. शहरात स्कूल बस चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका कष्टकरी वडिलांची कन्या कु. तनुजा किशोर मोगल हिने NEET परीक्षेत घवघवीत यश संपादन करत डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे भक्कम पाऊल टाकले आहे. अत्यंत कठीण आणि दडपणाच्या परिस्थितीतही तिने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ICI Education

 पहिल्या टप्प्यात ६५०, तर Re-NEET मध्ये ५८५ गुण

गजानन तिडके

देऊळगाव राजा : “जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन लाभले तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आभाळालाही गवसणी घालता येते,” हे देऊळगाव राजा येथील एका सामान्य कुटुंबातील मुलीने सिद्ध करून दाखवले आहे. शहरात स्कूल बस चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका कष्टकरी वडिलांची कन्या कु. तनुजा किशोर मोगल हिने NEET परीक्षेत घवघवीत यश संपादन करत डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे भक्कम पाऊल टाकले आहे. अत्यंत कठीण आणि दडपणाच्या परिस्थितीतही तिने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पैशांच्या अभावावर मात करत मिळवले यश

दहावीचा निकाल लागल्यानंतर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तनुजासोबतच्या इतर हुशार विद्यार्थिनी मोठ्या शहरांमध्ये महागड्या शिकवणीसाठी गेल्या. मात्र, पैशांच्या अभावामुळे तिचे वडील किशोर मोगल यांना तिला बाहेरगावी पाठवणे शक्य झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने तिला देऊळगाव राजा येथेच शिक्षण घ्यावे लागले. मात्र, स्थानिक पातळीवर ‘आय.सी.आय. एज्युकेशन’ (ICI Coaching Classes) चे संचालक फुके सर यांनी तनुजामधील गुणवत्ता ओळखून तिला मोलाचे मार्गदर्शन केले.

Re-NEET च्या दडपणातही दाखवली जिद्द

NEET च्या पहिल्या टप्प्यात (Phase-1) तनुजाने ७२० पैकी ६५० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे परीक्षा पुन्हा (Re-NEET) घेण्याचा निर्णय झाला. या मानसिक दडपणाखाली अनेक विद्यार्थी खचले; परंतु फुके सरांनी दिलेल्या मानसिक आधारामुळे तनुजाने पुन्हा जिद्दीने परीक्षा दिली आणि Re-NEET मध्येही ५८५ गुण मिळवत आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली.

बापाच्या कष्टाचे चीज झाले!

“मी एक साधा स्कूल बस चालक आहे. मुलीला मोठ्या शहरात शिक्षणासाठी पाठविण्याइतके पैसे नव्हते, त्यामुळे मनात नेहमी खंत वाटायची. पण आज निकाल लागल्यानंतर कळले की, बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांपेक्षाही माझी तनुजा पुढे निघून गेली आहे. फुके सरांनी माझ्या गरिबीला कधीच अडथळा होऊ दिला नाही. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज माझ्या लेकीने माझे स्वप्न पूर्ण केले,” अशी भावूक प्रतिक्रिया तनुजाचे वडील किशोर मोगल यांनी व्यक्त केली.

देऊळगाव राजाच्या मातीतूनही डॉक्टर घडतात : फुके सर

या यशाबद्दल बोलताना आय.सी.आय. एज्युकेशनचे संचालक फुके सर म्हणाले, “यश हे मोठ्या शहरांतील महागड्या फीवर अवलंबून नसून विद्यार्थ्यांची जिद्द, मेहनत आणि शिक्षकांचा विश्वास यावर अवलंबून असते. गुणवत्ता आणि चिकाटी असेल तर देऊळगाव राजासारख्या ग्रामीण भागातूनही तनुजासारखे डॉक्टर घडू शकतात. हे या विद्यार्थिनीने सिद्ध करून दाखवले आहे. तिचा हा विजय आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक आहे.”

तनुजा किशोर मोगल हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण देऊळगाव राजा तालुक्यातून तिच्यावर तसेच ‘आय.सी.आय. एज्युकेशन’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top