Prakash Khandebharad : अखिल भारतीय माळी महासंघाच्या देऊळगाव राजा तालुकाध्यक्षपदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ (प्रकाश) पांडुरंग खांडेभराड यांची निवड करण्यात आली आहे.

देऊळगाव राजा : अखिल भारतीय माळी महासंघाच्या देऊळगाव राजा तालुकाध्यक्षपदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ (प्रकाश) पांडुरंग खांडेभराड यांची निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष (घाटावरील) विष्णुभाऊ इंगळे, जिल्हाध्यक्ष (घाटाखालील) शरदजी बनकर तसेच अमरावती विभागाध्यक्ष विजय राजाभाऊ खरात यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या निवडीबद्दल सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रकाश खांडेभराड यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी, गोविंदराव बोरकर, प्रा. अशोक डोईफोडे, प्रा. विनायक कुळकर्णी, रमेश नरोडे, अरुण सपाटे, मधुकरराव धुळे, प्रकाश अहिरे, प्रा. विजय रायमल, गोविंदराव अहिरे, घनश्याम भंडारे, अरुण खरात, बाबुलाल शिवरकर, शांतिलालजी निरफळे, पंडितराव पाथरकर, प्रा. सतीश कुलकर्णी, घिके अप्पा, रामदास कुलथे, सय्यद नजीरभाई, गोरेसाहेब आदी उपस्थित होते. उपस्थितांनी खांडेभराड यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

