Mahabreaking

[breaking_news]

Maha e-Seva Kendras :अकोला जिल्ह्यात महा ई-सेवा केंद्रांचा बंद यशस्वी; विविध मागण्यांसाठी चालक आक्रमक

Maha e-Seva Kendras : अखिल स्तरीय महा ई-सेवा संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या महा ई-सेवा केंद्र बंदला अकोला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Maha e-Seva Kendras

मागण्यांसाठी महा ई-सेवा केंद्र चालकांचे आंदोलन; अकोला जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला : अखिल स्तरीय महा ई-सेवा संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या महा ई-सेवा केंद्र बंदला अकोला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महा ई-सेवा केंद्र चालकांना आधारसह विविध शासकीय योजनांबाबतचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करावे, शासन निर्णयानुसार पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात, नियमबाह्य पद्धतीने नव्या केंद्रांना परवानगी देण्याची प्रक्रिया थांबवावी, विविध दाखले मिळण्यात होणारा विलंब दूर करावा तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

संघटनेचे राज्य नेते विनोद तायडे यांच्या नेतृत्वाखाली, अमरावती विभागीय उपाध्यक्ष अनिल गिऱ्हे, जिल्हाध्यक्ष मनीष तिवारी, प्रणय बासोडे तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व तालुका प्रतिनिधी आणि महा ई-सेवा केंद्र चालकांनी बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अकोला जिल्ह्यातील बहुतांश महा ई-सेवा केंद्रे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शासनाने प्रलंबित मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top