Mahabreaking

[breaking_news]

Shri Sant Gajanan Maharaj :कुंभारीत श्री संत गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात

Shri Sant Gajanan Maharaj : शहरालगतच्या कुंभारी परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींचा प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच श्रींच्या पालखीचे शहरातील विविध भागांत भाविकांनी दर्शन घेतले.

Shri Sant Gajanan Maharaj'

पालखी सोहळा, हरिनाम सप्ताहाची सांगता: हजारो भाविकांचा महाप्रसाद लाभ

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : शहरालगतच्या कुंभारी परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींचा प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच श्रींच्या पालखीचे शहरातील विविध भागांत भाविकांनी दर्शन घेतले.

१ फेब्रुवारीपासून मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहादरम्यान ह.भ.प. भागवताचार्य महंत श्री स्वामी परमेश्वर यतीजी महाराज यांनी कथा सादर केली. तसेच ह.भ.प. नकुल महाराज (आळंदी), उद्भोध महाराज (पैठणकर), ह.भ.प. भीमाशंकर गुरुजी (परभणी), ह.भ.प. अर्जुन महाराज पळशीकर, ह.भ.प. अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, ह.भ.प. संतोष महाराज वनवे, ह.भ.प. बंडोपंत महाराज ढाकणे (परळी) आदी संत-महंतांचे कीर्तन झाले. ७ फेब्रुवारी रोजी मंदिर परिसरात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ तालुक्यासह जिल्हा व मराठवाड्यातील अनेक भाविकांनी घेतला.

प्रकटदिनाच्या दिवशी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प. निकम गुरुजी यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले असून हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला. पहाटे पाच वाजता कुंभारी परिसरातून श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी शहरातील विविध चौक-प्रभागांतून मार्गक्रमण करत मंदिरात दाखल झाली. ग्रामीण व शहरी भागातील सुमारे सव्वाशे दिंड्यांनी सहभाग नोंदविला. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सेवाभावी भक्तांनी दिंडिकऱ्यांसाठी नाश्ता-पाण्याची व्यवस्था केली होती. मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक ब्रह्मागिरी आणि त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top