Mahabreaking

[breaking_news]

 Mahaprasad :डोणगावात श्रींच्या प्रकटदिनानिमित्त ठिकठिकाणी महाप्रसाद वाटप 

Mahaprasad : शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त डोणगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आले.

Mahaprasad

डोणगाव  : शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त डोणगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आले. स्थानिक पोलीस स्टेशनजवळ श्री संत गजानन महाराज नाका ग्रुपच्या वतीने श्रींच्या मूर्तीची संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आरती करून सुमारे ७ क्विंटल पिठले-पोळी व शिरा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी हजारो भाविकांनी शिस्तीत महाप्रसादाचा लाभ घेतला.तसेच स्थानिक श्रीराम मठ येथे जय श्रीराम मठ मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सुमारे ६ क्विंटल पोळी-भाजी व शिरा महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. स्थानिक गजानन महाराज मंदिरातही महाप्रसाद वाटप करण्यात आले.या सर्व धार्मिक उपक्रमांमुळे डोणगाव परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top