Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Sant Gajanan Maharaj :बिबी येथे संत गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात;  नगरप्रदक्षिणा, कीर्तन व महाप्रसादाचे वितरण 

Sant Gajanan Maharaj : येथे संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त गजानन महाराज सांस्कृतिक आश्रम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ६ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात झाली. ८ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वितरणाने तीन दिवस चाललेल्या प्रकटदिन सोहळ्याची सांगता झाली.

Sant Gajanan Maharaj

रमेश खंडागळे 

बिबी : येथे संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त गजानन महाराज सांस्कृतिक आश्रम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ६ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात झाली. ८ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वितरणाने तीन दिवस चाललेल्या प्रकटदिन सोहळ्याची सांगता झाली.

सालाबादप्रमाणे यंदाही हा सोहळा गुरुवर्य संत ह.भ.प. रंगनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने व ग्रामस्थांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. यानिमित्त दररोज नामवंत महाराजांचे प्रवचन, कीर्तन, भारुड, तसेच राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती जनजागृती, ‘देश वाचवा – लेक वाचवा’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मंदिरात होमहवनयज्ञ, मूर्ती अभिषेक आदी धार्मिक विधी पार पडले.

प्रकटदिनानिमित्त काकडा भजन, हरिपाठ, गजानन विजय ग्रंथ पारायण यासाठी ९१ महिला-पुरुषांनी सहभाग नोंदविला. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्रींच्या प्रतिमेची रथातून नगरप्रदक्षिणा टाळ-मृदंगाच्या गजरात काढण्यात आली. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे वारकऱ्यांसोबत भजनात सहभागी झाले. रथपालखीचे पूजन ठाणेदार चंद्रकांत पाटील, अभयदादा चव्हाण (माजी समाजकल्याण सभापती), राजू इंगळे (जिल्हा परिषद सदस्य), चंद्रकला गुलमोहर (सरपंच), शाहीर शत्रुघ्न चव्हाण, बबन बनकर, संदीप चव्हाण, बबलू आटोळे, सागर बनकर, शकुआप्पा बनकर, राजू मुंढे, दिलीप फडके आदींच्या हस्ते करण्यात आले. काल्याचे कीर्तन सारंगधर महाराज टेके यांनी सादर केले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असून हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे विश्वस्त सारंगधर महाराज टेके, रमेश कुरंगळ, गोविंद टेके, गोपाल महाराज टेके, वैभव आंधळे, गोटू आवगळे, रमेश उबाळे, समाधान नरवडे तसेच समस्त ग्रामस्थ व परिसरातील भाविकांनी सहकार्य केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top